भरणेत उद्या सत्यशोधकीय जागृती परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरणेत उद्या सत्यशोधकीय जागृती परिषद
भरणेत उद्या सत्यशोधकीय जागृती परिषद

भरणेत उद्या सत्यशोधकीय जागृती परिषद

sakal_logo
By

rat20p20.jpg-
63606
खेडः कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडू ईश्‍वरी पालांडेचे अभिनंदन करताना संस्था सचिव डफळे व शिक्षक.
------------
कुस्ती स्पर्धेत ईश्‍वरी पालांडे प्रथम
खेडः तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचलित भरणे येथील नवभारत हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ईश्‍वरी पालांडेने प्रथम क्रमांक पटकावला. क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. या यशाबद्दल संस्था सचिव अ‍ॅड. तु. ल. डफळे यांच्या हस्ते पालांडे हिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहसचिव दत्तात्रय धुमक, स्कूल कमिटी अध्यक्ष दत्ताराम बैकर, खजिनदार राजाराम बैकर, प्राचार्य सुभाष सोनवलकर, उपप्राचार्य आर. आर. सकपाळ, पर्यवेक्षक ए. डी. नदाफ, क्रीडा शिक्षक बी. व्ही. मोरे, एस. जी. आंबेडे, एस. पी. फागे आदी उपस्थित होते.
------------
भरणेत उद्या सत्यशोधकीय जागृती परिषद
खेडः सत्यशोधक ओबीसी महासंघ व जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे 22 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता भरणे येथील श्री देवी काळकाई देवीच्या सभागृहात सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय सत्यशोधकीय जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवारआंबेरे येथील श्रमिक किसान सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, मुरलीधर बोरसुदकर, डॉ. राजेंद्र कवठेकर, श्रीकांत कदम, अनंत पालकर, जिल्हा नाभिक महासंघाचे कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, भटकी विकास आघाडीचे राज्याध्यक्ष नारायण ठसाळे, उद्योजक चंद्रकांत रेवाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
---------------
पन्हाळजे, लवेल येथे कुणबी जोडो अभियान सभा
खेड ः तालुक्यातील पन्हाळजे व लवेल येथे कुणबी समाजोन्नत्ती संघाची कुणबी जोडो अभियान सभा पार पडली. सभेत समाजाला भेडसावणार्‍या विविध अडचणींबाबत चर्चा करून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी कुणबी समाज शेतकरी संघ बहिरवली विभागाचे अध्यक्ष अनंत गोरिवले, सेके्ररटी शरद कदम, उपाध्यक्ष शांताराम भागणे, खजिनदार दीपक निकम, पन्हाळजे सरपंच तानाजी पाटील, तुंबाड सरपंच बेंडू कदम, श्रीधर भावे, ग्रामीणचे अध्यक्ष अमित कदम, सहसेक्रेटरी प्रवीण गीते, कुणबी सेवा संघ लवेल विभागाचे अध्यक्ष श्रीकांत चांदीवडे, कुणबी युवा प्रचारक बाळू सनगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
------------
बॅडमिंटन स्पर्धेसाठी जाधवची निवड
खेड ः क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश स्कूलमधील हर्षवर्धन जाधवने तृतीय क्रमांक पटकावला. त्याची शालेय विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली. रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. हर्षवर्धन जाधवने वैयक्तीक बॅडमिंटन निवड चाचणीत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात केली. त्याला क्रीडाशिक्षक कृणाल चव्हाण, शीतल घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
--
साखरप्यामध्ये अग्निशमन बंबाची गरज
साखरपाः रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील साखरपा जाधववाडी येथे एसटी बसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही त्यामुळे आगीसारखी आपत्कालीन घटना घडल्यास कोणतीच यंत्रणा नसल्याने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. या आधी साखरपा बाजारपेठेत आगीच्या अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे आगीसारख्या आपत्तीच्यावेळी अग्निशमन बंब असणे आवश्यक असून दोन दिवसांपूर्वी एसटी बसला लागलेली आग पाहण्याशिवाय कोणी काहीच करू शकत नव्हते. अशा वेळी मदतीसाठी धावलेल्या ग्रामस्थांनी प्रवाशांना वाचविले मात्र एसटी बस जळून खाक झाली.अशा घटना टाळण्यासाठी साखरपा येथे अग्निशमन बंबाची गरज आहे असे येथील नागरिकानी सांगितले.