शिवसेनेच्या सुषमा अंधारे आज कणकवली शहरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या सुषमा अंधारे 
आज कणकवली शहरात
शिवसेनेच्या सुषमा अंधारे आज कणकवली शहरात

शिवसेनेच्या सुषमा अंधारे आज कणकवली शहरात

sakal_logo
By

01008

शिवसेनेच्या सुषमा अंधारे
आज कणकवली शहरात

श्रीधर नाईक चौकात जाहीर सभा

कणकवली,ता. २० ः शिवसेनेच्या फायरब्रँडनेत्या सुषमा अंधारे यांची उद्या (ता. २१ ) कणकवलीत तोफ धडाडणार आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्त त्या कणकवलीत येत आहेत. उद्या सायंकाळी पाचला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची येथील श्रीधर नाईक चौकात जाहीर सभा होणार आहे.
जिल्हात ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणीला वेग आला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उद्या सिंधुदुर्गात येत आहे. अंधारे त्यांच्या सभेची तोफ कणकवलीमध्ये धडाडणार आहे. तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा, ओबीसी सेल सेना, त्याचप्रमाणे महिला शिवसैनिकांनी या सभेसाठी हजारोच्या संख्येने सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी केले आहे.
राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे. याला सडेतोड उत्तर सुषमा अंधारी देत आहेत. राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा गाजल्या आहेत. कणकवली हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गड आहे. राणेंच्या मैदानात अंधारी कुणावर निशाना साधणार हे उद्याच्या जाहीर सभेत कळणार आहे. यापुर्वी त्यांनी राणे पुता- पुत्राचा सभांमध्ये जाहीरपणे समाचार घेतला होता. त्यामुळे उद्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष आहे. या सभेसाठी शिवसेनेने गर्दी जमवण्याची मोठी तयारी सुरू केल्याचे दिसते.