गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्याची मागणी
गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्याची मागणी

गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्याची मागणी

sakal_logo
By

गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्याची मागणी
रत्नागिरी, ता. २० ः गायरान जमिन ती कसणाऱ्यांच्या व घरे बांधून राहणाऱ्यांच्या नावे करा व जमिनीवरील अतिक्रमण काढू नका, राज्य सरकारने आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल करा, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी शासनास दिला आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना देण्यात आले आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार संदर्भीय क्र. एक पत्रानुसार उपसचिव महसूल व वनविभागाने ११ ऑक्टोबर २०२२ च्या पत्रावर तत्काळ कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीसा लोकांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष जमीन कसणारे व घरे बांधून राहणारे कष्टकरी, मजूर, शेतकरी, आदिवासी बेघर होणार आहेत. म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर करा व जमिनीवरील अतिक्रमण काढू नका. तसेच आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा, असा विनंती अर्ज केला आहे.