दाभोळ-मराठा समाजाकडून कोशारी यांच्याविरोधात घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-मराठा समाजाकडून कोशारी यांच्याविरोधात घोषणा
दाभोळ-मराठा समाजाकडून कोशारी यांच्याविरोधात घोषणा

दाभोळ-मराठा समाजाकडून कोशारी यांच्याविरोधात घोषणा

sakal_logo
By

rat20p23.jpg-
63629
दापोलीः राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा निषेध करण्यासाठी जमलेले शिवप्रेमी.
-------------
कोश्यारी यांच्याविरोधात
मराठा समाजाकडून घोषणा
दाभोळ, ता. २०: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. रविवारी (ता. २०) सायंकाळी दापोली शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आवराबाहेर मराठा समाजाकडून कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा देऊन त्यांचा निषेध करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वातावरण तापले असून या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दापोली शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आवराबाहेर जमून मराठा समाजाच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवरायांचा जयजयकार करण्यात आला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हृषिकेश गुजर, मनसेचे सचिन गायकवाड यांच्यासह मराठा समाजाचे अनेक बांधव व भगिनी, शिवप्रेमी उपस्थित होते.