डिगस काळंबा देवीचा आज वार्षिक जत्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिगस काळंबा देवीचा
आज वार्षिक जत्रोत्सव
डिगस काळंबा देवीचा आज वार्षिक जत्रोत्सव

डिगस काळंबा देवीचा आज वार्षिक जत्रोत्सव

sakal_logo
By

63723
श्री काळंबा देवी

डिगस काळंबा देवीचा
आज वार्षिक जत्रोत्सव
कुडाळ ः तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता श्री काळंबा देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २२) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी देवीची विधीवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, त्यानंतर नवस बोलणे-फेडणे, रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा व त्यानंतर आजगावकर नाट्यमंडळाचे दशावतारी नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व मानकरी, श्री काळंबा देवी देवस्थान उपसमिती डिगस व डिगस ग्रामस्थांनी केले आहे.
..............
सारथी संस्थेंतर्गत वसतिगृहे
कणकवली ः सारथी संस्थेअंतर्गत लक्षित गटातील आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे विभागीय, जिल्हा, तालुकास्तरावर निवासाची व भोजनाची व्यवस्था होऊ शकत नाही. सारथी संस्थेमार्फत अशा विद्यार्थ्यांना राहण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर वसतिगृह उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना शासनस्तरावरून दिल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिताचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विभागीय स्तरावर सारथी संस्थेस काही ठिकाणी जागा प्राप्त झाल्या आहेत; परंतु इमारती उभे करण्यास बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विनावापर परंतु सुस्थितीतील इमारतींमध्ये वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत.
---

--
चिंदरवासीयांचा मुक्काम वाढला
आचरा ः शुक्रवारपासून गावपळणीमुळे वेशीबाहेर असलेल्या चिंदर ग्रामस्थांना आज गाव भरण्याची प्रतीक्षा होती; मात्र देवाने कौल दिला नसल्याने वेशीबाहेर एक दिवसाने मुक्काम वाढला आहे. प्रथेप्रमाणे बारा पाच मानकरी त्रिंबक सातेरी मंदिरात जमून न बोलता आज दुपारी दोनच्या सुमारास रवळनाथ मंदिरात जमून गाव भरण्याबाबत एकदाच कौल घेतला; पण तो डावा मिळाल्याने वेशीबाहेर ग्रामस्थांचा एक दिवस वाढला आहे. प्रथेप्रमाणे उद्या पुन्हा कौल घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
--
‘यादव चॅरिटी’ची २५ ला ओटवणेत सभा
सावंतवाडी ः महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेची विशेष सभा २५ ला ओटवणे गणेश मंदिर येथे सकाळी १० वाजता आयोजित केली आहे. या ट्रस्टच्या विद्यमान जिल्हा कार्यकारणीचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून एकमताने कार्यकारिणी बदल किंवा फेरनिवड करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या कार्यकारणीसाठी प्रभावीपणे काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकारिणीचा विस्तारही करण्यात येणार आहे. या विशेष सभेला या ट्रस्टच्या गवळी समाज बांधवांनी वेळेत उपस्थित राहवे, असे आवाहन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कार्यकारणीतर्फे करण्यात आले आहे.
-----------------------
कुडाळ बसस्थानक परिसरात दुर्गंधी
कुडाळ ः शहरात गांधी चौकनजीक असलेल्या एसटी स्टँडच्या आवारात आठवड्यातील बुधवार आणि रविवारी मासेविक्री केली जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवासी वर्ग तसेच एसटी कर्मचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायत आणि एसटी प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करताना दिसून येत नाहीत. या मासे विक्रेत्यांना कायमस्वरूपी मच्छिमार्केटमध्येच बसण्यास द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
--
‘माझे आजोळ’चे गुरुवारी लोकार्पण
मालवण ः मालवण तालुक्यातील कुसरवे गावातील आर्यानगरी भागात अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) च्यावतीने उभारण्यात आलेल्या ''माझे आजोळ'' या दुसर्‍या दुमजली वास्तूचा लोकार्पण सोहळा आणि श्री गणेश मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण सोहळा गुरुवारी (ता. २४) होणार आहे. गुरुवारी सकाळी धार्मिक विधी, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा, आरती, प्रार्थना, वास्तू लोकार्पण सोहळा, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन अनुराधा भरत भोगटे ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.