स्वमग्नता ः समदु:खी पालकांचे आधारगट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वमग्नता ः समदु:खी पालकांचे आधारगट
स्वमग्नता ः समदु:खी पालकांचे आधारगट

स्वमग्नता ः समदु:खी पालकांचे आधारगट

sakal_logo
By

rat२११६.txt

( टुडे पान ३ )

वैद्यक विश्व .........लोगो


इंट्रो

स्वमग्नता ओळखण्यासाठी पालकांनी विशिष्ट लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे असते. स्वमग्नतेचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी, एक्स-रे, स्कॅन अशा कुठल्याही चाचण्या नसतात त्यामुळे निदान करणे आणि ते पालकांना पटवणे कठीण असते. केवळ मुलांमध्ये आढळणाऱ्‍या लक्षण समूहांवरूनच तसा निष्कर्ष काढावा लागतो. या प्रकारात समदु:खी पालकांचे आधारगट महत्वाची भूमिका बजाऊ शकतात असे सांगताना याबाबतचे गैरसमज कोणते तेही नोंदणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध ......

डॉ. मेधा गोंधळेकर , रत्नागिरी


स्वमग्नता ः समदु:खी पालकांचे आधारगट


मुलाने स्वत:तच मग्न असणे, दुसऱ्‍याच्या अस्तित्वाची जाणीव नसणे, इतर मुलांत मिसळून न खेळता एकट्याने तोच तोच खेळ खेळत राहाणे, मैत्री करता न येणे, भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे, आपण होऊन बोलणे सुरू करण्यात वा चालू ठेवण्यात अक्षमता, एखादा शब्द किंवा वाक्य सतत बोलत राहणे तसेच आपण वा समोरच्याने बोललेले पुन्हा बोलणे. चाकाशीच गरगर फिरवत खेळत बसतील नाहीतर गाड्या नुसत्या एका ओळीत लावत राहतील. सतत एकच वर्तन करणे म्हणजे उगीचच हात हलवणे, गोलगोल फिरणे. फिरत्या वस्तूंकडे एकटक पाहात बसणे (चाक, पंखा), परिस्थितीत किंवा नेहमीच्या रूटिनमध्ये बदल झाल्यास अस्वस्थ होणे, संवादासाठी खाणाखुणा वापरणे, एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे. प्रकाश, आवाज, स्पर्श, वास, चव यांबाबत अतीसंवेदनशील असणे. कधी हिंसक वागणूक चावणे, ओरबाडणे, केस ओढणे अशी आणखीही अनेक लक्षणे स्वमग्नतेत दिसून येतात. यापैकी अनेक लक्षणे एकत्रितपणे आढळली तर स्वमग्नतेचे निदान करता येते. स्वमग्नता म्हणजे नेमके काय ते माहित नसल्यामुळे अशा मुलांना बऱ्‍याचदा मतिमंद समजतात. आपल्याला मूल वाढवणे जमत नाही का, आपल्या हातून दर्लक्ष झाले का, आपले काय चुकले? असे अनेक प्रश्‍न त्यांना सतावत असतात. समदु:खी पालकांचे आधारगट तयार झाले तर ते एकमेकांना सर्व बाबतीत मदत करू शकतात.
यावर उपाय आहे का, हा नेहमी समाजाला सतावणारा प्रश्न आहे. यावर वापरली जाणारी जी औषधे आहेत ती स्वमग्नतेसाठी नसून अतिचंचलता, नैराश्य, हिंसकपणा इ. कमी करण्यासाठी दिली जातात. जगभर त्यावर बरेच संशोधन चालू आहे; पण निदान वेळेवर झाले आणि योग्य प्रशिक्षण मिळाले तर बऱ्‍याच प्रयत्नांनी या मुलांना आपण स्वत:च्या पायावर उभे राहायला मदत करू शकतो. त्यासाठी अनेक संस्था काम करत असतात. सुदैवाने, आपल्या रत्नागिरीतही अशा संस्था आहेत. प्रत्येक मुलाची क्षमता, वागण्याची तऱ्हा, आवड, समस्या, उपचारांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन थेरपीची आखणी करावी लागते. यामध्ये आवाज थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, प्लेथेरपी, म्युझिक ड्रामा, बिहेवियरल थेरपी अशा अनेक मार्गांनी प्रशिक्षण दिले जाते. त्या योगे मुले स्वत:ची दैनंदिन कामे नीट करू शकतील, आपल्या पायावर उभे राहू शकतील. प्ले थेरपी, म्युझिक, ड्रामा, चित्रे, मैदानी खेळ या द्वारे चंचलता कमी व्हायला मदत होते. त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरता येते. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्याला योग्य दिशा दिली जाते. जितक्या लवकर हे निदान होईल तेवढी या मुलांची प्रगती होण्याची शक्यता अधिक. उचलून घेतलेले, कवटाळलेले न आवडणे, नजर न देणे, नजरानजर झाल्यावर एरवी बाळांच्या गालावर आपसूक उमटणारे हसू न दिसणे, वेळेवर हुंकारायला, बोलायला न शिकणे यासारख्या धोक्याच्या घंटांकडे वेळीच लक्ष देणे म्हणूनच महत्वाचे ठरते. ही समस्या लपवून न ठेवता सगळ्यांना मुलाच्या या समस्येबद्दल नीट माहिती दिल्याने सर्वांनाच प्रशिक्षणाच्या व पुनर्वसनाच्या प्रयत्नात सामील होता येईल. त्यासाठी त्यांच्या वर्तनबदलासाठी आणि सामाजिक समायोजनासाठी या मुलांना कौंटुंबिक कार्यक्रमांना, बाजार अशा ठिकाणी आवर्जून नेले पाहिजे.
मुलांमधील स्वमग्नतेबाबत अनेक गैरसमज आहेत. स्वमग्नता म्हणजेच मतिमंदता किंवा अध्ययन अक्षमता हा त्यापैकी एक. हा आजार भावनिक कुपोषण किंवा ताणतणावामुळे होतो, पालकांच्या नकारात्मक किंवा असंवेदनशील वागण्याने स्वमग्नता येते, हा मानसिक आजार आहे. ही फक्त मध्यमवर्गाची समस्या आहे, हे आणखी काही गैरसमज. लेखातील विवेचनामुळे हे गैरसमज दूर झाले तर खूप काही साधले म्हणायचे.