कोळंबे सड्यावर अनुभवला उल्कापाताचा आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळंबे सड्यावर अनुभवला उल्कापाताचा आविष्कार
कोळंबे सड्यावर अनुभवला उल्कापाताचा आविष्कार

कोळंबे सड्यावर अनुभवला उल्कापाताचा आविष्कार

sakal_logo
By

rat२११९.txt

(टुडे पान ३ साठी, फ्लायर)

फोटो ओळी
-rat२१p१०.jpg-
६३७०१
रत्नागिरी : कोळंबे येथील सड्यावरून फक्त डोळ्यांनी पाहिलेल्या उल्कापाताचे टिपलेले छायाचित्र.

कोळंबे सड्यावर अनुभवला उल्कापाताचा आविष्कार

२० उल्का अन १ अग्नीगोल ; १७ नोव्हेंबर रात्री परमोच्च बिंदू
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २१ ः खगोलशास्त्रातील माहिती पुस्तकातून वाचण्यापेक्षा ती प्रत्यक्ष अनुभवण्यातील आनंद घेण्याची पर्वणी निवडक रत्नागिरीकरांनी साधली. गुरावारी (ता. १७) रात्री उल्कापाताचा नयनरम्य आविष्कार अनुभवला. येथून नजीकच्या कोळंबे गांवच्या सड्यावरील अंधारी जागा शोधून तेथून रात्रभर अनुभवलेला सोहळा अंत्यंत रोमांचित करणारा होता, असे हौशी निरीक्षकांनी सांगितले. त्या रात्री उल्कापाताचा परमोच्च बिंदू असल्याने सड्यावरून तो अनुभवण्यासाठी ही रात्र निवडण्यात आली होती. रात्रभरात सुमारे २० उल्का पडताना पाहता आल्या. ही निरीक्षक मंडळी पहाटे तीनपर्यंत सड्यावर होती.

‘पाऊलखुणा’ या संस्थेतर्फे श्रीवल्लभ साठे यांनी या उल्कापात दर्शनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. उल्कापाताचे शास्त्रीय कारण, प्रक्रिया, आपल्या आकाशातून विशिष्ट वेळी दिसणारे तारे, ग्रह, नक्षत्रे, राशीसमूह आणि इतर खगोलीय घटकांची माहिती साठे यांनी उपस्थितांना करून दिली. याशिवाय भारतीय आणि ग्रीक परंपरेतील खगोलशास्त्रीय मनोरंजक तपशीलही श्रीवल्लभ साठे यांनी सांगितले. सिंह राशीतील हा उल्कापात ‘टेंपल टटल’ या धूमकेतूच्या पिसाऱ्यातील खडकांमुळे घडतो. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी आकाशात दृश्यमान होतो. दरवर्षी ६ ते ३० नोव्हेंबर याकाळात संपूर्ण उत्तर गोलार्धातून ही घटना अनुभवता येत असली, तरी १७ तारखेच्या रात्री या उल्कापाताचा परमोच्च बिंदू गाठला जातो. यादिवशी उपस्थितांना सुमारे २० उल्का पडताना पाहता आल्या, यांपैकी एक अग्नीगोल होता सांगताना साठे म्हणाले, अग्नीगोल म्हणजे मोठे आकारमान असलेली उल्का आणि ती अधिककाळ दृश्यमान राहताना तिच्यामागे मोठा धूराचा लोळ गेलेलाही दिसतो.
या कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी स्थानिक रहिवासी श्रीरंग मसूरकर यांचे सहकार्य लाभले. ‘पाऊलखुणा’ या संस्थेतर्फे आगामी काळातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

कोट
कोकणात अंधाराचे चांगलेच साम्राज्य असते. खगोलीय घटना पाहताना या परिस्थितीचा फायदा स्थानिकांनी घेतला पाहिजे. अनेक अविस्मरणीय अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, पण त्या प्रत्यक्ष पाहून अनुभवण्याची संधी आपण कमी साधतो. तशी ती साधता यावी आणि खगोलशास्त्रीय नजारे पाहायला मिळावेत यासाठी हा खटाटोप करीत असतो. हळुहळू लोकांना त्यातील गंमत आणि ज्ञान उमजू लागले आहे.
श्रीवल्लभ साठे.

आकाश दर्शन ते उल्कापात
शाळकरी विद्यार्थ्यांना साठे यांनी चंपक मैदानावर आकाश दर्शन घडवून आणले होते. तेव्हापासून माझा मुलगा खगोलशास्त्रात रस घेतो आहे. ग्रहताऱ्यांची माहिती घेण्यात त्याचा उत्साह वाढला आहे आणि ते तो आनंदाने अनुभवण्यास तयार असतो. त्यामुळेच ११ वर्षाच्या चिरंजीवाला घेऊन पहाटे तीनपर्यंत आम्ही उल्कापाताचा आनंद घेतला. पालकांनी मुलांना अशी माहिती आणि अनुभव घेण्यास प्रोत्साहन द्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अॅड. संदेश शहाणे यांनी दिली.