सावंतवाडीतील विकासकामे सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील विकासकामे सुरू करा
सावंतवाडीतील विकासकामे सुरू करा

सावंतवाडीतील विकासकामे सुरू करा

sakal_logo
By

63708
सावंतवाडी ः पालिका प्रशासनास निवेदन सादर करताना भाजपचे पदाधिकारी.

सावंतवाडीतील विकासकामे सुरू करा

भाजपची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः शहरातील विविध प्रलंबित विकासकामे तत्काळ सुरु करा, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. भटवाडी, बाहेरचा वाडा, झिरंगवाडी व माठेवाडा या भागात रस्ता डांबरीकरणासह गटारांच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. वर्क ऑर्डर होऊन मक्तेदारीची मुदत संपत आली तरीही कामे सुरू झाली नाहीत. याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून लोकप्रतिनिधींना म्हणून त्यांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याबाबत तत्काळ कार्यवाही सुरु करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत आज पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, दीपाली भालेकर, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरात अनेक ठिकाणी रस्ते आणि गटार दुरुस्तीचे प्रश्न प्रलंबित आहेत. वर्क ऑर्डर होऊन मक्तेदारी संपत आली तरी अद्याप या कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत असून तर लोकप्रतिनिधींना रोषास सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे लोकप्रतिनिधींना रोष सहन करावा लागत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही सुरु करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे.