''त्या'' वक्तव्यांच्या निषेधार्थ सावंतवाडीत आज ''आत्मक्लेश'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''त्या'' वक्तव्यांच्या निषेधार्थ
सावंतवाडीत आज ''आत्मक्लेश''
''त्या'' वक्तव्यांच्या निषेधार्थ सावंतवाडीत आज ''आत्मक्लेश''

''त्या'' वक्तव्यांच्या निषेधार्थ सावंतवाडीत आज ''आत्मक्लेश''

sakal_logo
By

63709
अण्णा केसरकर

‘त्या’ वक्तव्यांच्या निषेधार्थ
सावंतवाडीत आज आंदोलन

सावंतवाडी, ता. २१ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध करण्यासाठी सावंतवाडीत उद्या (ता. २२) ‘आत्मक्लेश’ आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांनी आज येथे दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. या विरोधात विविध स्तरावरून पडसाद उठत असतानाच केसरकर यांनी हा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन गवळी तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात येणार असून यावेळी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतची माहिती केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद भाष्य करण्याची हिंमत भाजप कार्यकर्त्यांना होते कशी? त्यामुळे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आहे, अशांनी या आत्मक्लेश आंदोलनामध्ये पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सहभागी व्हावे. राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनीही महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना पाठीशी घालू नये. याप्रकरणी त्यांनी उठाव करावा. तरुणांनी मोबाईल बाजूला ठेवून याबाबत जाब विचारण्यासाठी बाहेर पडावे.’’