सायबर पोलिस ठाण्याचे मोठे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर पोलिस ठाण्याचे मोठे यश
सायबर पोलिस ठाण्याचे मोठे यश

सायबर पोलिस ठाण्याचे मोठे यश

sakal_logo
By

rat२१p२५.jpg -
६३७७५
रत्नागिरी - हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकांना परत देण्यात आले.
--------------
सायबर पोलिस ठाण्याचे मोठे यश
हरवलेले, चोरीचे ८० मोबाईल जप्त; पोलिस अधीक्षकांच्या हस्ते केले परत
रत्नागिरी, ता. २१ : जिल्हा पोलिस दलाला हरवलेले आणि चोरीला गेले सुमारे ८० मोबाईल परत मिळविण्यात यश आले आहे. गेल्या
दोन महिन्यांमध्ये पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाणे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेच्या तपासाला हे यश प्राप्त झाले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकाला आज ते परत देण्यात आले.
जिल्हा पोलिस दलाचे सायबर पोलिस ठाणे आणि तांत्रिक विश्लेषण शाखा यावर मेहनत घेत आहे. जिल्ह्यातील चोरीला गेलेले आणि हरवलेले एकुण ८० मोबाईल संदर्भात तक्रारी होत्या. हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाइल्स (भ्रमणध्वनी) शोधून काढणे पोलिसासमोर आव्हान होते. शोध प्रक्रियेत रत्नागिरी पोलिसांनी एकूण ८० मोबाईल हॅंडसेट जप्त केले. आज पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पोलिस अधिकारी, अमलदार यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेले ८० मोबाईल हँडसेट (भ्रमणध्वनी) मुळ मालकांना परत करण्यात आले. ओटीपी शेअर करणे, अनोळखी लिंकवर क्लिक करणे, लॉटरीच्या आमिषाला बळी पडणे रिवॉर्ड पॉईंट्सच्या हव्यासापोटी आपल्या बँक खात्याची माहिती देणे व परिणामी आपल्या बचत खात्यातील सर्व पैसे गमावून बसणे अशा अनेक सायबर गुन्ह्यांमधील प्रचलित फसव्या तंत्राना नागरिक बळी पडत असतात.
यासाठी नागरिकांनी सजग जागरूक राहणे आवश्यक आहे. रत्नागिरी पोलिस दल सदैव आपल्या मदतीसाठी उपलब्ध, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले.

चौकट
सायबर गुन्ह्यांसंबंधी काही सूचना…
- परिचित नसलेल्या लिंकवर क्लिक करू नये.
- आपला ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
- गूगल सर्चवर दिसणाऱ्या फसव्या लिंकवर पैसे भरू नयेत.
- रिवॉर्ड पॉईट्सच्या हव्यासापोटी आपल्या बैंक खात्याची माहिती उघड करू नये.
- आपल्या सभोवती घडणाऱ्या व इतर गुन्ह्यांसोबत सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने देखील पोलिसांना तात्काळ माहिती घ्यावी.
- निकडीच्या प्रसंगी तसेच अत्यावश्यक मदतीकरिता डायल ११२ वर संपर्क साधावा.