किंजळेतील कॉजवेच्या ठिकाणी होणार उंच पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किंजळेतील कॉजवेच्या ठिकाणी होणार उंच पूल
किंजळेतील कॉजवेच्या ठिकाणी होणार उंच पूल

किंजळेतील कॉजवेच्या ठिकाणी होणार उंच पूल

sakal_logo
By

rat२१८.txt

(पान ५ साठी )

फोटो ओळी
-rat२१p३३.jpg
६३८१३
खेड ः पुलाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार योगेश कदम.


किंजळेतील कॉजवेच्या ठिकाणी होणार उंच पूल

काम पावसाळ्यापूर्वी होणार पूर्ण ; ग्रामस्थांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा ः
खेड, ता. २१ ः तालुक्यातील किंजळेतर्फे नातू येथे दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्‍या कॉजवेच्या जागी आता नवीन उंच पूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याचा निर्धार आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात याच कॉजवेवरून पाणी जात असल्याने एका लहान मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी उशीर झाल्याने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत आमदार कदम यांनी पुलाच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पुलाचे काम सुरू झाले. ठाकरे सरकारच्या काळात या पुलासाठी निधी मागूनही मिळाला नाही. परंतु शिंदे सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे कदम यांनी सांगितले. आमदार योगेश कदम यांनी या पुलाच्या कामाची अधिकाऱ्‍यांसमवेत पाहणी केली.
तालुक्यातील किंजळेतर्फे नातू व पुरे बुद्रूक नदीवर उंच पूल बांधण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या दोन्ही पुलांचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती आशा जाटाळ यांनी सांगितले.