आंबोली घाटातून दुचाकीसह मोबाईल, साहित्य पळविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली घाटातून दुचाकीसह
मोबाईल, साहित्य पळविले
आंबोली घाटातून दुचाकीसह मोबाईल, साहित्य पळविले

आंबोली घाटातून दुचाकीसह मोबाईल, साहित्य पळविले

sakal_logo
By

आंबोली घाटातून दुचाकीसह
मोबाईल, साहित्य पळविले

सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः चक्कर आल्याने दुचाकी रस्त्यालगत लावून झोपलेल्या एकाची आंबोली घाटातून दुचाकीसह बाजाराच्या साहित्याची पिशवी, मोबाईल व पाकिटातील रोख रक्कम चोरीस गेली. हा प्रकार शनिवारी (ता.१९) घडला. याबाबत सदाशिव गोविंद गावडे (वय ५९ रा. कुंभवडे) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की ः गावडे यांना सुटी असल्यामुळे ते किरणा सामानाच्या खरेदीसाठी शनिवारी सकाळी आठच्या सुमारास सावंतवाडीत आले होते. बाजार घेतल्यानंतर ते पुन्हा कुंभवडे येथे जात होते; मात्र ते आंबोली घाटात पोहचले असता त्यांना चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे रस्त्यालगत दुचाकी उभी करून ते तेथेच बाजूला जमिनीवर झोपले. त्या ठिकाणी त्यांना बराच वेळ झोप लागली. यावेळी आंबोलीच्या दिशेने जाणारे निखिल गुरव यांनी गावडे यांना पाहिले व त्यांनी याबाबतची माहिती आंबोली येथील अमरेश गावडे यांना सांगितले. त्यानुसार अमरेष गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदाशिव गावडे यांना घेऊन त्यांच्या घरी सोडले. श्री. गावडे यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या गाडीची व सामानाची चौकशी केली असता कुठे मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वीस हजार किमतीची गाडी, ४००० हजाराची रोख रक्कम, पाचशे रुपयांचा बाजार दोनशे रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत.