कठोर परिश्रमांतून यश हमखास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कठोर परिश्रमांतून यश हमखास
कठोर परिश्रमांतून यश हमखास

कठोर परिश्रमांतून यश हमखास

sakal_logo
By

63822
सिंधुदुर्गनगरी ः ऑनलाईन मार्गदर्शन करताना करिश्मा नायर.

कठोर परिश्रमांतून यश हमखास

करिष्मा नायर ः स्पर्धा परीक्षांबाबत ऑनलाईन मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव सुरू ठेवा. वाचनामध्ये सातत्य ठेवा. प्रशासकीय सेवांबाबतच्या परीक्षांची सखोल माहिती घेण्याबरोबरच चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी वृत्तपत्रांचे नियमितपणे वाचन करा. कठोर परिश्रमांची तयारी ठेवून जिद्दीने प्रयत्नरत राहिल्यास यश हमखास मिळेल, असा सल्ला प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर यांनी दिला.
मूळ केरळच्या व सध्या जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. असलेल्या नायर यांनी विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. नायर म्हणाल्या, ‘‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे, हे प्रथम निश्चित करा. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु करा. आवडीचे आणि सोपे जाणारे विषय निवडून अभ्यासाची दिशा ठरवा. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्यासक्रमांची माहिती करून घ्यावी. त्यासाठी आवश्यक माहितीपूर्ण पुस्तके व इतर बाबींची यादी तयार करा. अभ्यासात येणाऱ्या छोट्यामोठ्या शंकांचे मार्गदर्शकांकडून तातडीने निरसन करून घ्यावे. भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये मुख्य परीक्षेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यावा. ज्यांनी या परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे, त्यांचे ऑनलाईन व्हिडीओ पाहावेत. पुस्तकांच्या वाचनातून टिपणांचे वर्गीकरण करून त्यानुसार अभ्यास करा. स्पर्धा परीक्षांचे पेपर लिखाण करताना प्रथम प्रश्न समजून घ्यावेत. उत्तरे मुद्देसूदपणे लिहावीत. उत्तरांची खात्री असलेले प्रश्न तातडीने सोडवावेत.’’ तहसीलदार पाटील यांनी आभार मानले.
................
चौकट
विविध उपक्रमांमुळे अभ्यासाला दिशा!
जिल्ह्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जावेत, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत यश मिळविलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन, त्यांनी केलेल्या यशस्वी वाटचालीचे अनुभव परीक्षार्थींना सांगितले जातात. यामधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा मिळते. अभ्यास करताना येणाऱ्या शंका, अडचणींचे निराकरण या माध्यमातून करून घेता येते, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या.