मळगाव वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव वाचनालयातर्फे
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मळगाव वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मळगाव वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

मळगाव वाचनालयातर्फे
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
बांदा, ता. २१ ः मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात १० डिसेंबरला सकाळी दहाला माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुलांसाठी (कै.) डॉ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘रविवार माझ्या आवडीचा’, ‘निसर्ग माझा सोबती’, ‘पुस्तकांच्या सहवासात’, असे विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर ४ ते ५ मिनिटे बोलायचे आहे. आठवी ते दहावी गटासाठी ‘मी वसुंधरा बोलतेय’, ‘अमृत महोत्सवी आपला भारत’, ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे’, असे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर ५ ते ६ मिनिटे बोलायचे आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख १०००, ७५०, ५०० रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना २०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एका शाळेतील जास्तीत जास्त तीन स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांना एसटीचा प्रवास खर्च व अल्पोपहार देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी ९ डिसेंबरपर्यंत ग्रंथपाल आनंद देवळी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.