पांजरवाडा-माठेवाडा पूल रस्त्याची दुरवस्था पांजरवाडा-माठेवाडा पूल रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांजरवाडा-माठेवाडा 
पूल रस्त्याची दुरवस्था
पांजरवाडा-माठेवाडा 
पूल रस्त्याची दुरवस्था
पांजरवाडा-माठेवाडा पूल रस्त्याची दुरवस्था पांजरवाडा-माठेवाडा पूल रस्त्याची दुरवस्था

पांजरवाडा-माठेवाडा पूल रस्त्याची दुरवस्था पांजरवाडा-माठेवाडा पूल रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

63858
सावंतवाडी ः पांजरवाडा पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था.

पांजरवाडा-माठेवाडा
पूल रस्त्याची दुरवस्था

नागरिक त्रस्त; राष्ट्रवादीच्या नेवगींचा आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी, ता. २१ ः शहरातील विविध कामे अर्धवट असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील पांजरवाडा ते माठेवाडा जोडणारा पुलाचा रस्ता अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना चालत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी राकेश नेवगी यांनी दिला आहे.
शहरातील माठेवाडा ते पांजरवाडा दरम्यानचा रस्ताही खड्डेमय झाला असून या मार्गावर नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाला जोडणारा रस्ता नसल्यामुळे नागरिकांना चालत जाताना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर दुचाकी व चार चाकी वाहने नेताना चालकांचीही तारेवरची कसरत होत आहे. पालिकेने लाखो रुपये खर्च करून नाल्यावर सिमेंट काँक्रीटच्या पूल उभारला आहे. मात्र, याला जोडणारा रस्ता नसल्यामुळे गेले दोन वर्षे या मार्गावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता होण्यासाठी येथील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सुरुवातीला रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्याला सिमेंट काँक्रेटने बुजवले. कमकुवत झालेला नवा पूल उभारण्यात आला. मात्र, त्याला जोडणारा रस्ता अजूनही अपूर्ण आहे. पांजरवाडा ते माठेवाडा हा रस्ता आधीच रुंद असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नेवगी यांनी केली आहे. याकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.