कुणकेश्वर यात्रेचे नियोजन वेळेतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणकेश्वर यात्रेचे नियोजन वेळेतच
कुणकेश्वर यात्रेचे नियोजन वेळेतच

कुणकेश्वर यात्रेचे नियोजन वेळेतच

sakal_logo
By

63821
मुंबई ः येथे श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.

कुणकेश्वर यात्रेचे नियोजन वेळेतच

पालकमंत्र्यांची ग्वाही; मुंबईत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

देवगड, ता. २१ ः तालुक्यातील श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यंदा भाविकांना मनाप्रमाणे दर्शन घेता यावे याचबरोबरच यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजनाची सभा दोन महिने अगोदर घेऊन संभाव्य गैरसोयी दूर करण्याबाबत विनंती करण्यात आली. यावेळी वेळेतच सभेचे नियोजन करण्याबरोबरच प्रशासनाला आवश्यक सूचना करण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले.
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी व कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले असता त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कुणकेश्‍वरच्या स्थानिक विकासाबाबत चर्चा केली. यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत घाडी, देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, खजिनदार अभय पेडणेकर, सचिव शरद वाळके, विश्वस्त विजय वाळके, विश्वस्त संजय आचरेकर, विश्वस्त संतोष लाड आदी उपस्थित होते. पालकमंत्री चव्हाण यांना कुणकेश्वर मंदिराची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त ‘श्रीं’ च्या दर्शनाला येण्याचे आमंत्रण यावेळी देण्यात आले. यात्रेत भाविकांना मनाप्रमाणे दर्शन घेता यावे तसेच यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय पातळीवरील नियोजनाची सभा दोन महिने आगावू घेऊन संभाव्य गैरसोयी दूर करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. वेळेतच सभेचे नियोजन करू, असे आश्वासन दिले. कुणकेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते व इतर आवश्यक सुविधांबाबत कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असेही सांगितले. दरम्यान, यावेळी पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक कामांचे पत्रही पालकमंत्र्यांना दिले.