कनेडी परिसरात ढगाळ वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी परिसरात 
ढगाळ वातावरण
कनेडी परिसरात ढगाळ वातावरण

कनेडी परिसरात ढगाळ वातावरण

sakal_logo
By

कनेडी परिसरात
ढगाळ वातावरण
कनेडी ः येथील परिसरात मंगळवारी (ता. २२) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हवामानातील गारवा कमी झाला; तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बदललेल्या या वातावरणाचा फटका आंबा व काजूला बसणार आहे. तसेच, पावसाने हजेरी लावल्यास जनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल. पाऊस झाल्यास उन्हाळी शेती, भाजीपाला लागवड लांबण्याची शक्यता आहे.
--------
करंजे येथे
गव्यांचा वावर
कणकवली ः करंजे (ता. कणकवली) गावात सध्या गव्यांचा कळप वावरत असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कनेडी-फोंडा रस्त्यावर अलीकडे वाहनचालकांना गव्यांचे कळप फिरताना दिसले. दाजीपूर अभ्यारण्यातील गवे कळपाने कोकणात उतरत आहेत. वन्यजीव वस्तीत शिरकाव करू लागल्याने स्थानिक भयभीत झाले.
---
नेरूर कोलडोंगर
जत्रोत्सव उद्या
नेरूर ः येथील श्री देव कोलडोंगर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. २४) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी पाचला स्थानिकांची भजने, साडेसहाला शिवगणेश भजन मंडळ (मालवण)चे बुवा महेश मालप व लिंगरवळनाथ भजन मंडळाचे (पोखरण) बुवा समीर कदम यांचा डबलबारी भजनाचा सामना, रात्री एकला खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.
---------------
सातार्डा रवळनाथ
जत्रोत्सव आज
सावंतवाडी ः सातार्डाचे ग्रामदैवत श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा दिवजांचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. २३) होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह भाविकांची गाऱ्हाणी, नवस होतील. रात्री अकराला दीपस्तंभावरील दीप उजळण्यात येणार आहेत. पालखी प्रदक्षिणा व राजाधिराज कार्यक्रम झाल्यावर रात्री एकला आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
--------------
भोगवेत आज
वार्षिक जत्रोत्सव
वेंगुर्ले ः भोगवे-नेवाळी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. २३) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह रात्री एकला बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होईल. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.