कुडाळमध्ये ६१ अर्ज वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळमध्ये ६१ अर्ज वैध
कुडाळमध्ये ६१ अर्ज वैध

कुडाळमध्ये ६१ अर्ज वैध

sakal_logo
By

कुडाळमध्ये ६१ अर्ज वैध
---
खरेदी-विक्री संघ निवडणूक; १५ जागांसाठी होणार लढत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः तालुका-खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल (ता. २१) झाली. यात सर्व ६१ अर्ज वैध ठरले. या वेळी कोणीही कोणाविरुद्ध हरकत घेतली नाही. या निवडणुकीत १५ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत अर्ज मागे घेता येतील. या संघाच्या १५ जागांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
या संघाची निवडणूक बिनविरोध होईल की मतदान होणार, हे आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसाद रेगे, माजी सभापती किशोर मर्गज यांच्यासह एकूण ६१ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, छाननीत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. या निवडणुकीसाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले काम पाहत आहेत. अर्जांची छाननी प्रक्रिया झाल्यावर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ६ डिसेंबर दुपारी तीनपर्यंत आहे. निशाणी वाटप व उमेदवारांची अंतिम यादी ७ डिसेंबरला सकाळी अकराला सहकारी संस्था, निवडणूक कार्यालय व संस्था सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १८ डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे.
सहकारी संस्था प्रतिनिधी सदस्य पाच, व्यक्ती गत सभासद प्रतिनिधी सदस्य पाच, महिला राखीव सदस्य दोन, अनुसूचित जाती-जमाती सदस्य एक, विमाप्र सदस्य एक, इतर मागासवर्गीय सदस्य एक असे एकूण १५ सदस्य निवडले जाणार आहेत.
सहकारी संस्था प्रतिनिधी संघातून १५ अर्ज असून, यात आता सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून अरविंद शिरसाट, चंद्रकांत माधव, संजय पालव, विजय प्रभू, सच्चिदानंद पालव, वैशाली प्रभू, किशोर मर्गज, दीपक ऊर्फ केशव नारकर, पंढरीनाथ सावंत, विलास बुटाले, नित्यानंद कांदळगावकर, भालचंद्र ऊर्फ भाऊ के. वारंग, महादेव परब, महेश राऊळ, सदाशिव आळवे अशा १५ जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी मतदारसंघातून २९ अर्ज असून, यात सतीश नाईक, मुकुंद धुरी, रमाकांत धुरी, वासुदेव गावडे, सुभाष भिसे, काशीनाथ परब, भास्कर परब, गंगाराम परब, सतीश साळगावकर, राजन परब, अशोक पालव, अजित राणे, जोसेफ डॉन्टस, विठ्ठल माळकर, विनायक आणावकर, महादेव परब, संजय पाटकर, राजेंद्र भोगटे, आनंद गावडे, संजय पोळ, नारायण शृंगारे, प्रसाद रेगे, बाळकृष्ण राऊळ, गोपाळ हरमळकर, नीलेश तेंडुलकर (दोन अर्ज), सदाशिव आळवे अशा एकूण २९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव मतदारसंघातून पाच अर्ज दाखल झाले असून, यात अनुराधा कांदळगावकर, वैशाली प्रभू, गुणप्रभा शिरोडकर, वैशाली बेळणेकर, स्मिता तेरसे यांचा समावेश आहे.
---
इतर मतदारसंघातून काही अर्ज
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून मोहन जाधव व आत्माराम ओटवणेकर यांचे दोन अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त-भटक्या जाती संघ दोन अर्ज ः विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून तुकाराम भोई, बापूजी गोसावी यांनी अर्ज दाखल केले. इतर मागास संघातून आठ अर्ज असून, विनायक अणावकर, सुभाष भिसे, गोपाळ हरमलकर, जनार्दन कदम, संजय पडते, नीलेश तेंडुलकर, गुरुनाथ मुंज, सदाशिव आळवे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.