विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी शाळेकडून भेटकार्ड,पुस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी शाळेकडून भेटकार्ड,पुस्तक
विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी शाळेकडून भेटकार्ड,पुस्तक

विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी शाळेकडून भेटकार्ड,पुस्तक

sakal_logo
By

rat२२१७.txt

( टुडे पान २ )

rat२२p८.jpg -
६३९१०
चिपळूण ः येथील सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या पालक सभेवेळी पालकांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी शाळेकडून भेटकार्ड, पुस्तक

सती चिंचघरी प्राथमिक शाळा ; पालक सभेत विविध निर्णय

चिपळूण,ता. २२ ःशाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे होत असतात, त्यावेळी शाळेकडून विद्यार्थ्याला भेटकार्ड देणे तसेच एक साबण व पुस्तक स्वीकारणे अशा उपक्रमावार सती चिंचघरी प्राथमिक शाळेच्या पालक सभेत चर्चा करण्यात आली. यासोबतच शालेय पोषण आहार, इतर मागास शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांचे दप्तर, वेळापत्रक, सुधारीत शैक्षणिक आराखडा याची देखील पालकांना माहिती करून देण्यात आली.
सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता.चिपळूण या विद्यालयाची पालक सभा मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पालकांना ई-लर्निंग, सेमी इंग्लिश, थ्री डी थिएटर, संगणक लॅब, ई-बुक गॅलरी त्याचप्रमाणे विविध उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली. शाळेला देणगी देणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक रूची रूपेश राणे यांनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक सहल, वनभोजन, वार्षिक स्नेहसंमेलन याचे नियोजन यावेळी करण्यात आले.