नेरुरमधील प्रकल्पाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुरमधील प्रकल्पाबाबत
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेरुरमधील प्रकल्पाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नेरुरमधील प्रकल्पाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By

नेरुरमधील प्रकल्पाबाबत
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कुडाळ, ता. २२ ः तालुक्यातील नेरुर येथील अवैधरित्या सुरू असलेला ‘तो’ बायोमेडीकल प्रकल्प त्वरित बंद करावा, अशी मागणी कुडाळ नगरपंचायत नगरसेविका संध्या तेरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तालुक्यातील नेरुर या गावात ‘त्या’ या नावाने जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, हॉस्पिटल, सरकारी दवाखाने यामध्ये होणारा जैविक वैद्यकीय कचरा शासनाच्या परवानगीशिवाय सर्व नियमांना डावलून जमिनीत पुरला जातो आणि जाळला जातो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होतेच; परंतु माणसांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपनी चालविण्यास आवश्यक लायसन्सची मुदत जानेवारीमध्ये संपली असूनही ही कंपनी नेरुर येथे अवैधरित्या अजूनही काम करत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी या कंपनीवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी नगरसेविका तेरसे यांनी केली आहे.