गोव्यात नोकरीसाठी सिंधुदुर्गात परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यात नोकरीसाठी सिंधुदुर्गात परिषद
गोव्यात नोकरीसाठी सिंधुदुर्गात परिषद

गोव्यात नोकरीसाठी सिंधुदुर्गात परिषद

sakal_logo
By

63981
प्रमोद सावंत


गोव्यात नोकरीसाठी सिंधुदुर्गात परिषद
---
मुख्यमंत्री सावंत; प्रसंगी केंद्राचीही मदत, तेलींच्या मागणीची दखल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारांना गोव्यात नोकऱ्या मिळण्यासाठी दोन्ही ठिकाणच्या तरुणांना एकत्र घेऊन रोजगार परिषद घेण्यात येईल. त्यासाठी केंद्राचीही मदत घेतली जाईल, अशी भूमिका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांडली. तशी मागणी माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली होती. गोव्यातून सिंधुदुर्गात जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांना कर आकारला जात असेल, तर या प्रकाराची चौकशी करून तो तत्काळ थांबविण्यात येईल, असेही ते या वेळी म्हणाले.
गोवा येथे एका खासगी कार्यक्रमात सिंधुदुर्गातील पत्रकारांशी मुख्यमंत्री सावंत यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने गोव्यात नोकरीसाठी येत आहेत. युवकांना भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दोन्ही ठिकाणच्या तरुणांना एकत्र घेऊन दोन्ही राज्यांच्या सीमेवर रोजगार परिषद घेण्याचा मानस आहे. त्यासाठी केंद्राचीही मदत घेतली जाईल.’’ या वेळी गोव्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, चंद्रकांत शेट्ये, माजी खासदार नीलेश राणे, संजू परब, महेश सारंग, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
---
सिंधुदुर्ग-गोव्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे
सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध चांगले आहेत. हे संबंध अधिक वृध्दिंगत व्हावेत, यासाठी तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत रोजगार परिषदेत योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. शिवाय, केंद्राच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पोचविता येतील. यासाठी लवकरच नियोजन करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

कोट
गोवा-बांबोळी (गोमेकॉ) रुग्णालयात सिंधुदुर्गातील रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, विमा योजना व अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे काही रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागतो. यावर निश्चितच तोडगा काढला जाईल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा