‘त्या’ कुंड्यांमध्ये घरगुती कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ कुंड्यांमध्ये घरगुती
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
‘त्या’ कुंड्यांमध्ये घरगुती कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई

‘त्या’ कुंड्यांमध्ये घरगुती कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By

63971
सावंतवाडी ः मोती तलाव परिसरात टाकण्यात आलेला कचरा.

‘त्या’ कुंड्यांमध्ये घरगुती
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
सावंतवाडी पालिका; किरकोळ कचरा टाकण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः येथील मोती तलाव परिसरात ठेवलेल्या कचराकुंडीत नियमित कचरा टाकणाऱ्यांविरोधात येथील पालिकेने कारवाईच्या निर्णय घेतला आहे. या कचराकुंडीत प्लास्टिक कप चमचे आदी वस्तू टाकण्यासाठी सोय केली असताना घरगुती कचरा मिळाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतील असून त्याचा शोध घेऊन कारवाई करणार असल्याचे पालिकेचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी सांगितले.
येथील मोती तलावाच्या परिसरात बसणाऱ्या नागरिकांना आईस्क्रीमचे कप तसेच अन्य किरकोळ कचरा टाकण्यासाठी तलावाभोवती कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत; मात्र गेले काही दिवस त्यात घरातील कचरा आणून टाकल्याचा प्रकार होत आहे. पालिका प्रशासनाकडून त्या कचऱ्याचे विलगीकरण करून नेमका कचरा कोणाचा याचा शोध घेण्यात येत आहे. काल (ता. २१) शोध घेत असताना मुंबईतील एका व्यक्तीचा कचरा त्या ठिकाणी आढळून आला. विशेष म्हणजे त्या कचऱ्यात आधार कार्डची झेरॉक्स होती. त्यामुळे त्याआधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे नाटेकर यांनी सांगितले. किरकोळ कचरा टाकण्यासाठी या कचराकुंड्या बसविल्या असून त्यात घरगुती कचरा टाकू नये; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.