रत्नागिरी-हर्डीकर, टोळ्ये, पेंढारकर, पाध्ये यांना विशेष पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-हर्डीकर, टोळ्ये, पेंढारकर, पाध्ये यांना विशेष पुरस्कार
रत्नागिरी-हर्डीकर, टोळ्ये, पेंढारकर, पाध्ये यांना विशेष पुरस्कार

रत्नागिरी-हर्डीकर, टोळ्ये, पेंढारकर, पाध्ये यांना विशेष पुरस्कार

sakal_logo
By

rat२२p१.jpg-
६३८८८
रत्नागिरी : रेणू दांडेकर, शलाका टोळ्ये, कल्याणी हर्डीकर, तन्मय हर्डीकर, अमोघ पेंढारकर, चैतन्य पाध्ये.

हर्डीकर, टोळ्ये, पेंढारकर, पाध्ये यांना विशेष पुरस्कार
कऱ्हाडे ब्राह्मण संघ; २७ ला वितरण; शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांचे व्याख्यान
रत्नागिरी, ता. २२ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाने विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी व्याकरणरत्न पदवी संपादन केल्याबद्दल तन्मय हर्डीकर, संस्कृत न्यायशास्त्रातील महापरीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ. कल्याणी तन्मय हर्डीकर, बौद्धिक संपदा विभागातील यशस्वी उद्योजिका म्हणून भारत सरकारने गौरव केलेल्या सौ. शलाका टोळ्ये, पायी नर्मदा परीक्रमा करणारे अमोघ पेंढारकर व चैतन्य पाध्ये यांना विशेष पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
विशेष पुरस्कार आणि गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम येत्या रविवारी (ता. २७) दुपारी ३.३० वाजता कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर व्याख्यान देणार आहेत. बदल कसा स्वीकारूया यावर त्या बोलतील. सौ. दांडेकर या लेखिका असून त्यांनी लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ३३ वर्षे मराठीचे अध्यापन केले. मराठी भाषांसंदर्भात विशेष काम केले आहे. पाठ्यपुस्तक महामंडळात परीक्षण समितीच्या सदस्य, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेबद्दलचे विशेष मार्गदर्शन त्या करत आहेत.
तन्मय हर्डीकर यांनी माणगाव येथे ऋग्वेदीय स्मार्त याज्ञिकाचे आंशिक अध्ययन केले. नंतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून संस्कृत विषयात पदवी मिळवली. श्रीविद्या पाठशाळेत व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले. नंतर कांची कामकोटी पिठाधीश श्री विजेयेंद्रसरस्वती स्वामीजींच्या सान्निध्यात महापरीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या श्री विद्या पाठशाळेत व्याकरणशास्त्राचे अध्यापन करतात. या दांपत्याला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सौ. कल्याणी हर्डीकर यांनी महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांच्या पुणे येथील नृसिंहसरस्वती पाठशाळेत न्यायशास्त्राचे अध्ययन सुरू केले व काणकोण येथे वाग्वर्धिनी पाठाशाळेत अध्ययन पूर्ण केले. १६ ऑगस्ट २२ रोजी शृंगेरी येथे श्री विद्युशेखरभारती स्वामीजींच्या उपस्थितीत महापरीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या श्रीविद्या पाठशाळा गोवा येथे त्या न्यायशास्त्राचे अध्यापन करत आहेत.
अमोघ पेंढारकर हे देवरुखमध्ये औषध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. तसेच गोळवली, संगमेश्वर येथील चैतन्य पाध्ये याने बीकॉम पदवी संपादन केली असून वयाच्या २१ व्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.

चौकट
बौद्धिक संपदा क्षेत्रात यश
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या महिला वैज्ञानिक उपक्रमाअंतर्गत बौद्धिक मालमत्ता अधिकार या विषयात पेटंट एजंट ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सौ. शलाका टोळ्ये या २०१९ मध्ये नोंदणीकृत भारतीय पेटंट एजंट झाल्या. पुढे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी (मार्च २०२२) मध्ये बौद्धिक संपदा क्षेत्रातच कार्यरत राहिलेल्या व्यावसायिक अशा ७५ यशस्वी महिलांची दखल घेतली. याबद्दल त्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघ सन्मानित करणार आहे.