आगामी निवडणुकीमुळे मिळू लागलाय मानसन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगामी निवडणुकीमुळे मिळू लागलाय मानसन्मान
आगामी निवडणुकीमुळे मिळू लागलाय मानसन्मान

आगामी निवडणुकीमुळे मिळू लागलाय मानसन्मान

sakal_logo
By

ग्रामपंचायत रणधुमाळी.......लोगो
64010,
12411
.........…
भाऊ, तुमच्यामुळेच उभा राहतोय...
निवडणुकीमुळे मिळू लागलाय मानसन्मान; इच्छुकांकडून सामान्यांची विचारपूस; राजकीय पक्षांपेक्षा पुढारी सजग
चिपळूण, ता. २२ः गावातील अनेक लोकांना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने का होईना मानसन्मान मिळत आहेत. सध्या गावागावात जो तो निवडणुकीच्या गोष्टी करू लागला आहे. ज्याच्याशी कधी कोणी बोलायचे नाही, त्याची भावी उमेदवार मोठ्या आदराने विचारपूस करत आहेत. अनेकांच्या घरी जाऊन प्रचार करत आहेत की, ‘भाऊ, तुमच्यामुळेच सरपंचपदासाठी उभा राहतो लक्ष असू द्या.’ अनेक लोक गावातील चौकाचौकात कठड्यावर बसून उमेदवारांचे भविष्य ठरवत आहेत. थेट जनतेतून निवडणूक असल्यामुळे उमेदवाराला गावातील लोकांचा जेवणाचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पैशाची मोठ्या प्रमाणात तरतूद करावी लागणार आहे. अनेकांनी आपापल्या मतदारांची यादी, मतदारांची नावे व मतदार यादी जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु केली आहे.
तालुक्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष असला तरीदेखील तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून दिली तर काँग्रेसला ही निवडणूक सोपी जाणार आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादीने दगाफटका न केल्यास काँग्रेसला आशादायी यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप शिंदे गटाला बरोबर घेणार की स्वतंत्र लढणार हे निवडणुकीत दिसेल. मतदारांनी भाजप व शिंदे गटाला नापसंती दर्शवणाऱ्या घटकाला शिवसेने, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पर्याय ठरतील. मागील पाच वर्षात भाजपची कामगिरी सुमार झाली. भाजपने शहर आणि ग्रामीण भागात प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला तरी अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. जिजाऊ सामाजिक संघटनेला राजकीय क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मनसे आणि इतर प्रादेशिक पक्षाचे उमेदवार किती मते घेणार यावर विजयी उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकंदरीत गेल्या दोन-अडीच वर्षांपासून राजकीय क्षेत्रात असलेली मरगळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झटकून निघणार आहे. पक्ष संघटना बांधणीसाठी सर्वच पक्षांनी या निमित्ताने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये नेतृत्व सक्षमीकरण करणे आवश्यक असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनीदेखील शाखांचे विस्तार करण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचा आधार घेतला आहे. तालुक्यातील राजकीय चित्र पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

चौकट
बिनविरोध झाल्या तर रंग फिके
चिपळूण तालुक्यातील एकमेव पोफळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामपंचायत निवडणुका या राजकीय पक्षविरहित होत असल्या तरीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रभाव, त्या दरम्यान स्थापन होणाऱ्या स्थानीय आघाड्या या निवडणुकीसाठी महत्वाच्या ठरत असतात. या वेळी थेट सरपंचपदाची निवडणूक होती; परंतु ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीतील रंगत निघून गेली. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीत ती दिसणार आहे.