जिल्ह्यातील 15,471 बागायतदारांनी उतवरला विमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील 15,471 बागायतदारांनी उतवरला विमा
जिल्ह्यातील 15,471 बागायतदारांनी उतवरला विमा

जिल्ह्यातील 15,471 बागायतदारांनी उतवरला विमा

sakal_logo
By

rat२२९.TXT

( टुडे पान १)

जिल्ह्यातील पंधरा हजार बागायतदारांनी उतवरला विमा

३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत ः सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २२ ः प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेंतर्गत आंबा, काजूचा समावेश आहे. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत १५ हजार ४७१ बागायतदारांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी २२ हजार शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. आठ दिवस शिल्लक असून या योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२२-२३ या साठी राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, काजू या फळपिकांचा समावेश असून गेल्या काही वर्षात बदलत्या हवामानामुळे दोन्ही पिकांना मोठा फटका बसला होता. विमा उतरवलेल्या बागायतदारांना परताव्याच्या रुपाने याचा लाभ मिळाला होता. यंदाही हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून त्याचा परिणाम आंबा, काजू या पिकांवर होण्याची शक्यता आहे. किमान तापमान, कमाल तापमान आणि अवेळी पाऊस, वारा, गारपीट यासाठी झालेल्या नुकसानीपोटी परतावा मिळणार आहे. यामध्ये काजूसाठी विमा हप्ता ५ हजार रुपये असून एक लाख रुपये संरक्षित रक्कम आहे. तर आंब्यासाठी १३ हजार ३०० हप्ता असून १ लाख ४० हजार संरक्षित रक्कम आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरवायाचा आहे. यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनी नियुक्त केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कृषी विभागाकडून बागायतदारांना विमा उतरवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत १५ हजार ४७१ शेतकर्‍यांनी विमा उतवलेला आहे. ७ हजार हेक्टरवर क्षेत्र विमा संरक्षीत करण्यात आले आहे. सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात ३१०९ आंबा तर ७८ काजू बागायतदारांनी विमा उतरवला आहे. या योजनेत एका शेतकऱ्याला चार हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवण्याची मुभा दिलेली आहे. कुळाने किंवा भाडेपट्टीने फळपिके घेणाऱ्‍या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


विमा उतरलेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी ः

तालुका*आंबा (हेक्टर)*काजू (हेक्टर)
* मंडणगड*१२३१*४४
* दापोली*८१३*३२१
* खेड*४४०*५४
* चिपळूण*१०४६*१६०
* गुहागर*७०३*७६
* संगमेश्वर*२१४०*८९९
* रत्नागिरी*३१०९*७८
* लांजा*१३७९*६५९
* राजापुर*१२८५*१५४