टोपीवाला हायस्कुलमध्ये मुलांना खाऊचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोपीवाला हायस्कुलमध्ये
मुलांना खाऊचे वाटप
टोपीवाला हायस्कुलमध्ये मुलांना खाऊचे वाटप

टोपीवाला हायस्कुलमध्ये मुलांना खाऊचे वाटप

sakal_logo
By

६४००३
मालवण ः युवती सेनेच्यावतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

टोपीवाला हायस्कुलमध्ये
मुलांना खाऊचे वाटप
मालवण ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवती सेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्या सौजन्याने बालदिन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील टोपीवाला हायस्कूल मधील शिशुविहार-काळे आजींची बालवाडी या शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या मालवण युवती अधिकारी निनाक्षी शिंदे-मेतर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सिंधु रक्तमित्र संस्थेच्या अध्यक्ष व समाजसेविका शिल्पा खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख नंदा सारंग व विद्या फर्नांडिस, युवती सेनेच्या कार्यकर्त्या सुर्वी लोणे, शबनम आजरेकर, शीतल पेडणेकर, सायली तारी, बालवाडीच्या संचालिका मालती काळे, श्रीधर काळे, मुख्यशिक्षिका संस्कृती बांदकर, शिक्षिका निशा बिडये, शालन सावंत, प्रज्ञा राणे, शर्वरी घाडी आदी उपस्थित होते.
------------
६३९७९
श्री देवी माऊली

डोंगरपाल माऊली जत्रोत्सव उद्या
बांदा ः डोंगरपाल येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव देव दीपावलीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २४) साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती व डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
--
रेडी माऊलीचा आज जत्रोत्सव
सावंतवाडी ः रेडी गावची ग्रामदेवता व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २३) होत आहे. यानिमित्त सकाळी श्री देवी माऊली व परिवार देवतांची पूजा, ८ वाजता उत्सव मूर्ती सजावट, त्यानंतर ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांस प्रारंभ, ११ वाजता देवीच्या साड्यांचा लिलाव, रात्री ११.३० वाजता तेल वाटप व पुराण वाचन कार्यक्रम, ११.४५ वाजता देवीसमोरील पोवाडा, ज्योतीचा विधी, रात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देवी माऊलीची पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोसवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
चेअरमनपदी संतोष नानचे
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी नगरसेवक संतोष नानचे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी अशोक सावंत यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी अनिल क्षीरसागर, पल्लवी पई, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, रमेश दळवी, चंदू मळीक, अमित प्रसादी, बाळा कोरगावकर, सुनील म्हावळंकर, अभिमन्यू कुबल, संजय गवस, ज्ञानेश्वर गवस, कल्पना बुडकुले, उपेक्षा पांगम, पांडुरंग कदम आदी उपस्थित होते.
--
मालवणात उद्या मनसेची बैठक
मालवण : तालुका मनसेची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (ता. २४) सकाळी साडेदहाला पंचायत समिती नजीकच्या हॉटेल विशाल येथे आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३० नोव्हेंबरला होत असलेला कोकण दौरा व आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केले आहे. मालवण शहर व तालुक्यातील मनसे, मनविसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले आहे.