बांदा पोलिसांविरोधात सिंधुदुर्गनगरीत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा पोलिसांविरोधात सिंधुदुर्गनगरीत उपोषण
बांदा पोलिसांविरोधात सिंधुदुर्गनगरीत उपोषण

बांदा पोलिसांविरोधात सिंधुदुर्गनगरीत उपोषण

sakal_logo
By

64013
सिंधुदुर्गनगरी ः येथे धरणे आंदोलनास बसलेले सुमेध गावडे.

बांदा पोलिसांविरोधात सिंधुदुर्गनगरीत उपोषण

सुमेध गावडेंचे आंदोलन; दारु वाहतुकीत दुसऱ्याच मोटारीवर कारवाई केल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २२ः गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान मोटार सोडून देत त्याऐवजी दुसऱ्याच मोटारीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी कोलगाव येथील सुमेध गावडे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे सांगत तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराही गावडे यांनी दिला.
गावडे यांच्या म्हणण्यानुसार, बांदा पोलिसांनी जुलै २०२२ मध्ये गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी एक आलिशान मोटार पकडली होती. मात्र, ती लगेच सोडण्यात आली. परंतु, त्या आलिशान मोटारीऐवजी त्या ठिकाणी दुसरी मोटार दाखवून कारवाईचा सोपस्कर पूर्ण करण्यात आल्याचा आरोप गावडे यांनी केला. या प्रकाराबाबत गावडे यांनी १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत बांदा पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. यावेळी जिल्हा दौऱ्यावर असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी यावर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कोकण परीक्षेत्रिय पोलिस महानिरीक्षक यांनीही याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावडे यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
---
...तर आत्मदहन करण्याचा इशारा
या ठिकाणीही न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे सांगत तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील गावडे याने दिला आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.