मोबाईल अॅपद्वारे शेतमालाची थेट विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल अॅपद्वारे शेतमालाची थेट विक्री
मोबाईल अॅपद्वारे शेतमालाची थेट विक्री

मोबाईल अॅपद्वारे शेतमालाची थेट विक्री

sakal_logo
By

rat२२३०.txt


( पान २ मेन )

मोबाईल अॅपद्वारे शेतमालाची थेट विक्री

मार्केट मिर्ची डॉट कॉम ; मध्यस्थ नसल्याने तोटा कमी
सकाळ वृत्तसेवा ः
दाभोळ, ता. २२ : सध्या विविध क्षेत्रात मोबाईल फोनचा वापर वाढत आहे. आपले शेतकरीही मोबाईलचा वापर करतात. शेतकरी शेतमालाचे उत्पादन घेत असतात. परंतु त्याची विक्री करताना त्यांना असंख्य अडचणी येतात. अशावेळी मध्यस्थांची मदत घ्यावी लागते, ज्यामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागतो. परंतु आता स्मार्ट मोबाईलचा वापर करून शेतकरी आपल्या मालाची थेट विक्री करू शकतात. मार्केट मिर्ची डॉट कॉम आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मार्केट मिर्ची या मोबाइल ॲपचा वापर करून शेतमालाची खरेदी - विक्री कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यासाठी मार्केट मिर्चीद्वारा "मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग" ही संकल्पना या मोहिमेच्या मुख्य मार्गदर्शक प्रगती गोखले यांनी मांडली. आय आय टी, मुंबईच्या मदतीने त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने त्या भारतात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात. Market Mirchi या अॅपचा वापर करून कोणीही आपल्या शेती आणि तत्सम उत्पादनाची विक्री करू शकतो. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा कोणाला पैसे देण्याची गरज नाही.
याच मोहिमेचा भाग म्हणून कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस (सिंधुदुर्ग), लांजा (रत्नागिरी), रोहा (रायगड) आणि विद्यापीठ मुख्यालय, दापोली (रत्नागिरी) येथे याबाबतच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या पाच प्रशिक्षण वर्गांचा लाभ ३४५ शेतकरी, महिला, बचत गट सदस्य आणि विद्यार्थी यांनी घेतला. यामध्ये ओरोस-किर्लोस येथे ८३, लांजा येथे ६१, रोहा येथे ६७ तर दापोली येथे १३४ जण उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर न जाता एकत्रितपणे गटागटांच्या साह्याने याचा वापर करावा म्हणजे त्याचा जास्त फायदा होईल, असा सल्ला त्यांनी दिला. या सर्व प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थिनी आपल्या उत्पादनाच्या जाहिराती उत्तमप्रकारे तयार करून त्या ॲपवर अपलोड केल्या.


मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह
या प्रशिक्षणात प्रगती गोखले यांनी Market Mirchi हे ॲप ऑनलाईन मार्केटिंगसाठी कशाप्रकारे वापरावी याचे सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह केले. त्यांनी Market Mirchi ॲप Google Play Store वरून कसे डाउनलोड करावे, त्याचा वापर करून आपल्या मालाची जाहिरात कशी करावी, शेतमाल खरेदी किंवा विक्री करायचा असेल तर त्यासाठी काय करावे याबद्दलची माहिती प्रत्यक्षिकासह करून दाखविली. या ॲपद्वारे शेतमालाच्या खरेदी विक्री बरोबरच आपल्या व्यवसायात इतरांना रोजगारही देऊ शकतो. शेती विषयात शिक्षण घेणारे विद्यार्थी या अॅपद्वारे नोकरीही मिळवू शकतात. तशी सुविधा या ॲपमध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले.