युवासेना मूर्तवडे गण विभाग अधिकारीपदी दिनेश वहाळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवासेना मूर्तवडे गण विभाग अधिकारीपदी दिनेश वहाळकर
युवासेना मूर्तवडे गण विभाग अधिकारीपदी दिनेश वहाळकर

युवासेना मूर्तवडे गण विभाग अधिकारीपदी दिनेश वहाळकर

sakal_logo
By

rat२२p९.jpg
६३९११
चिपळूणःयुवासेना मूर्तवडे गण विभाग अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या दिनेश वहाळकर यांचे अभिनंदन करताना आमदार भास्कर जाधव.

युवासेना मूर्तवडे गण विभाग
अधिकारीपदी दिनेश वहाळकर
चिपळूणः युवासेना मुर्तवडे पंचायत समिती गण विभाग अधिकारीपदी दिनेश वहाळकर यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र तालुका अधिकारी उमेश खताते यांनी दिले आहे. या निवडीनंतर वहाळकर यांनी वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. वहाळ येथील तरुण कार्यकर्ते दिनेश वहाळकर, संत गोरोबा कुंभार विकास मंडळाचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून युवक जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तिला काही दिवसांपूर्वी झालेल्या रक्तदान शिबिरात वहाळकर यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. राजकीय क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत तर व्यावसायिक क्षेत्रात समीर कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी पाहून युवासेना तालुकाधिकारी उमेश खताते यांनी दिनेश वहाळकर यांच्यावर मूर्तवडे पंचायत समिती गण विभाग अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. या पदाला न्याय देऊ, अशी ग्वाही वहाळकर यांनी दिली आहे.
-----------
rat२२p७.jpg
६३९०९
देवरुखःकिल्ले महिमतगड येथे श्रमदान मोहीम, गडफेरी यासह तेथे सफाई करणारा चमू.

महिमतगड येथे श्रमदान मोहीम
देवरुखः किल्ले महिमतगड (निगुडवाडी) येथे श्रमदान मोहीमेसह पदभ्रमंती व गडफेरी कार्यक्रम उत्साहाने पार पडला. महाराष्ट्राला गडकिल्यांचे संग्रहालय म्हटले जाते व शिवछत्रपतींच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी १९ ते २५ नोव्हेबर २०२२ दरम्यान ‘जागतिक वारसा सप्ताह’ सुरू आहे. या निमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांचे कार्यालय व दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्यावतीने २० नोव्हेंबरला देवरुख जवळील किल्ले महिमतगड (निगुडवाडी) येथे श्रमदान मोहीम व गडावर पदभ्रमंती करून गडफेरी करण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या दुर्गवीरांनी गडावरील बुरुजा कडे जाणाऱ्या पायवाटा मोकळ्या केल्या. पावसामुळे त्या वाटेवर गवत, झाडी - झुडपे वाढली होती व त्यामुळे पाऊलवाटा झाकल्या गेल्या होत्या. त्याचबरोबर भवानी मातेच्या मंदीरासमोर असणारा बुरुज झाडी झुडपातून मोकळा करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना बुरुजाकडे जाण्यासाठी व गडफेरी करण्यासाठी सोईचे होईल. या मोहिमेत रोहित बालडे, शिवम गायकवाड, निशांत जाखी, दीप्ती साळवी, स्वप्निल पाडावे, आर्यन शिंदे, योगेश सावंत, कौशिक चव्हाण, धोंडीराम सरवदे, कुमार सरवदे, भावेश सावंत, अमर जाधव, यश सावंत, साहिल मांजरेकर, शिवम सावंत, सौरभ मांजरेकर, मंगेश शिवगण, प्रणव राक्षे, सुहेल फामे, अक्षय गवंडी सह एकूण २० दुर्गवीर सहभागी झाले होते.
-------