राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे
राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे

sakal_logo
By

rat२२२७.txt

( पान २ साठी )

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे

अॅड. पाटणे ; इतिहास वाचून मुले इतिहास घडवू शकतील
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २२ : स्वातंत्र्ययुद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी एकाकी लढा दिला. मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील असलेल्या अशा या पराक्रमी राणीचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. नवा इतिहास घडविण्यासाठी, त्यांचा वैचारिक पाया मजबूत करण्यासाठी ते आवश्यक आहे. ही मुलेच हा इतिहास वाचून इतिहास घडवू शकतील, असा विश्वास येथील अॅड. विलास पाटणे यांनी व्यक्त केला.
राणी लक्ष्मीबाईंची जयंती कार्यक्रम नाचणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्र. १ आणि कोट येथील रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टतर्फे ओम साई मित्र मंडळ सभागृहात झाला. त्या त्यावेळी ते बोलत होते. कोट येथील रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड या वेळी म्हणाले, कोट गावात राणीचे वंशज दत्तात्रय नेवाळकर यांनी दोन एकर जागा स्मारकासाठी दिली आहे. तेथे स्मारक उभे राहणार आहे. पण केवळ स्मारक उभे राहून उपयोग नाही. राणीचा इतिहास लहानांपासून शाळा-कॉलेजच्या लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. नाचणे गावाने त्यासाठी पुढाकार घेतला, हे फारच स्तुत्य आहे. राणीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, तिचे चरित्र लोकांना समजावून सांगावे, यासाठीच स्मारक ट्रस्टची स्थापना केली आहे.

नाचणे गावचे सरपंच ऋषिकेश भोंगले यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका आठल्ये, कोट गावचे माजी सरपंच आणि लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष शांताराम ऊर्फ आबा सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शुभम सावंत, लांज्यातील कल्पना कॉलेजचे संचालक मंगेश चव्हाण, मुलांचे पालक उपस्थित होते.