दाभोळ : आंजर्ले खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ : आंजर्ले खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा
दाभोळ : आंजर्ले खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा

दाभोळ : आंजर्ले खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा

sakal_logo
By

rat२२p१६.jpg
L६३९८३
आंजर्ले : येथील खाडीमधून सक्शन पंपाच्या सहाय्याने काढली जात असलेली वाळू.

आंजर्ले खाडीमध्ये बेकायदा वाळू उपसा
महसूल विभागावर दुर्लक्ष केल्याचा ठपका
दाभोळ, ता. २२ : दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा सुरु असून त्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याची तक्रार या खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांकडून केली आहे.
आंजर्ले खाडीमध्ये गेली अनेक वर्षे महसूल विभागाच्या सहकार्याने वाळू उपसा करण्यात येत असून यावर्षी एकाही वाळू व्यावसायिकाने अद्याप एकही रुपयाच्या रॉयल्टीचा भरणा शासनाकडे केलेला नाही मात्र अनेक व्यावसायिक या खाडीमधून सक्शन पंपाद्वारे वाळुचा मोठ्या प्रमाणात उपसा करत असल्याची तक्रार स्थानिकाकडून करण्यात येत असूनही महसूल विभागाकडून त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.
आज दुपारी काही वाळू व्यावसायिक दापोलीच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात जमले होते त्यांच्यात वाळूच्या दरावरून वाद सुरु होते. एका व्यावसायिकाने रात्री अन्य वाळू व्यावसायिकांच्या गाड्या अडवण्याची भूमिका घेतल्याचेही पहावयास मिळाले. रॉयल्टीचा भरणा न करता केलेला व्यवसाय त्यातच या व्यावसायिकांमध्ये वाळुच्या दरावरून असलेली भांडणे विश्रामगृहाच्या आवारात असलेल्या नागरिकांना पहावयास मिळाली.
आंजर्ले खाडीत दररोज रात्री सक्शन पंपाच्या सहाय्याने हा वाळू उपसा केला जात असून या वाळूची वाहतूक रात्रभर सुरु असते, सकाळपर्यंत जास्तीत जास्त वाहतूक होण्यासाठी भरधाव वेगाने डम्पर चालविले जात असल्याची तक्रार स्थानिकांमधून केली जात आहे, एका वाळू व्यावसायिकाने तर पावसाळ्यातही वाळुचा उपसा सुरूच ठेवलेला होता. त्याचेवर कोणतीही कारवाई करण्यास महसूल विभाग धाडस दाखवत नसल्याची चर्चाही आंजर्ले खाडी परिसरात सुरू आहे. महसूल विभागाने अनधिकृत वाळू उपसा करण्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.राज्य शासनाने रॉयल्टीचे दर ३ हजार ५०० रुपयावरून ८०० रुपये प्रती ब्रास इतके कमी केले असले तरी ग्राहकाना ती ५ हजार रुपये प्रती ब्रास या दराने विकली जात असल्याने दररोज शेकडो ब्रास रॉयल्टी न भरताच वाळू काढून केलेल्या या व्यवसायात किती उलाढाल केली जाते हे दिसून येते.