तुरळ येथे ट्रक थेट दुकानात घुसला पण अनर्थ टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुरळ येथे ट्रक थेट दुकानात घुसला पण अनर्थ टळला
तुरळ येथे ट्रक थेट दुकानात घुसला पण अनर्थ टळला

तुरळ येथे ट्रक थेट दुकानात घुसला पण अनर्थ टळला

sakal_logo
By

raat२२p२०.jpg
६४००८
तुरळः येथे दुकानामध्ये घुसलेला ट्रक.

तुरळ येथे विचित्र अपघातात
ट्रक घुसला दुकानात
संगमेश्वर, ता. २२ः मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूणकडून रत्नागिरीकडे जाणारा तुरळ येथे उभा असणारा ट्रक दुसऱ्या ट्रकने ढकलत असताना ड्रायव्हर बसला नसल्याने थेट दुकानात घुसला. या अपघातात दुकानाचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक (एम एच ०९ क्यू ५९१२) हा लोटे येथून रत्नागिरीकडे चालला होता. सकाळी चालकाने चहा पिण्यासाठी ट्रक तुरळ येथे थांबवला असता ट्रकचा स्टार्टर लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने दुसऱ्या ट्रक चालकास पाठीमागून ट्रकने धक्का मारण्यास सांगितले. मात्र पुढच्या ट्रकमध्ये चालक बसलेला नसताना मागील ट्रकने धक्का दिला तेव्हा चालक नसल्याने त्याला आवश्यक दिशा देता न आल्याने ट्रक जवळच असणाऱ्या दुकानांच्या रांगेत घुसला. ट्रक ज्या केशकर्तनालयात घुसला तिथे असणाऱ्या ग्राहक व दुकानदाराने समयसूचकता दाखवल्याने जीवितहानी टळली.