काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून राज्यपाल कोश्यारींचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून राज्यपाल कोश्यारींचा निषेध
काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून राज्यपाल कोश्यारींचा निषेध

काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून राज्यपाल कोश्यारींचा निषेध

sakal_logo
By

64054


काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून
राज्यपाल कोश्यारींचा निषेध
रत्नागिरी, ता. २२ ः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने मारुती मंदिर येथे मंगळवारी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
रत्नागिरी अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी राष्ट्र पुरुषांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून अपमान केला आहे. याचा निषेध करुन कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन काढून टाका असे केंद्र शासनाला आवाहन केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी या आंदोलनात सहभागी होवून निषेध करताना भाजपवर टीका केली.
याप्रसंगी काँग्रेसचे रमेश शाहा म्हणाले, ‘‘आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणूनबुजून अपमान केला जात आहे. काँग्रेसतर्फे भाजपाचा पण निषेध करत आहोत.’’
आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडूशेट सावंत, तालुका अध्यक्ष विकास पाटील, प्रदेश महिला रुपाली सावंत, दीपक राऊत, शहर अध्यक्ष साईराज चव्हाण यांच्यासह हारिस शेकासन, मिथिलेश देसाई, रमेश शाह, बंडू सावंत आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.