कोकण सारथी नौकाभ्रमण सी गल्ससमवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण सारथी नौकाभ्रमण सी गल्ससमवेत
कोकण सारथी नौकाभ्रमण सी गल्ससमवेत

कोकण सारथी नौकाभ्रमण सी गल्ससमवेत

sakal_logo
By

rat२२p११.jpg-
६३९०४
दाभोळ : २ महा. एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण सारथी नौकाभ्रमण मोहीम सुरू असताना समुद्रात सी गल्स पक्षांसमवेत बोटी वल्हवण्याचा आनंद लुटला.

कोकण सारथी नौकाभ्रमण सी गल्ससमवेत
रत्नागिरी, ता. २२ : २ महा. नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर के. राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी छात्रसैनिक कोकण सारथी ही नौकाभ्रमण मोहिम मोठ्या उत्साहात सुरू आहे. ही मोहिम दाभोळ येथे पोहोचत असताना भर समुद्रात सीगल्स पक्ष्यांचा सुरेख नजारा छात्रसैनिकांनी अनुभवला.
दाभोळ, धोपावे येथे एनसीसी छात्रसैनिकांनी बोट सेलिंग, पुलिंग करत किनारा गाठला. त्या वेळी भर समुद्रात सीगल्स पक्षांसह डॉल्फिन्सचे दर्शन छात्रांना झाले. किनारपट्टीच्या भागात एनसीसी छात्रसैनिकांनी प्लास्टिक मुक्त समुद्र या विषयावर पथनाट्य सादर केले. सकाळी प्रचंड थंडी, थोडे धुके आणि दुपारी कडक ऊन यातूनही एनसीसी छात्रसैनिक न थकता प्रवास करत दररोज नियोजित किनारा गाठत आहेत. या मोहिमेची १५ नोव्हेंबरला भगवती बंदरातून सुरवात झाली. रत्नागिरी, वरवडे, जयगड, तवसाळ, बोऱ्या, दाभोळ, धोपावे, अंजनवेल, वेलदूर या बंदरांना भेट दिली आहे.
काळबादेवीतून २४ नोव्हेंबरला भगवती बंदरात या मोहिमेची सांगता होणार आहे. शिडाच्या तीन नौकांमधून पुलिंग व सेलिंग करत एनसीसीचे ६० छात्र सहभागी झाले आहेत. बंदरानजीकच्या लोकवस्तीमध्ये पथनाट्ये सादर करून किनारपट्टीच्या भागातील लोकांचे प्रबोधन करत आहेत. समुद्रातून एकूण १७७ नॉटिकल मैल अंतर पार केले जाणार आहे. एनसीसी अधिकारी, नौका, सुरक्षा बोट, मदतनौका, भारतीय हवामान खाते, नेव्ही, कोस्टगार्डचे सहकार्य या प्रसंगी मिळत आहे.