सिंधुकन्या पूर्वा गावडेचा राष्ट्रीयस्तरावर डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुकन्या पूर्वा गावडेचा राष्ट्रीयस्तरावर डंका
सिंधुकन्या पूर्वा गावडेचा राष्ट्रीयस्तरावर डंका

सिंधुकन्या पूर्वा गावडेचा राष्ट्रीयस्तरावर डंका

sakal_logo
By

64096
अहमदाबाद : राष्ट्रीय स्पर्धेत दुसरी आलेल्या पूर्वा गावडे हिचा सत्कार करताना मान्यवर.

पूर्वा गावडेचा राष्ट्रीयस्तरावर डंका

जलतरणात रौप्य ः अहमदाबादमधील स्पर्धेत मिळविले यश

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः सिंधुदुर्गकन्या पूर्वा गावडे हिने गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन्स सीरिज-२ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे.
जुलै महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीयस्तरावर रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर १ ऑगस्टला अहमदाबाद येथे झालेल्या १८ वर्षांखालील ज्युनिअर मुलींच्या खेलो इंडिया वुमन्स सीरिज-१ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लायमध्ये दुसरा क्रमांक, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारांत पाच पदके पटकावली होती. त्यानंतर आता पुन्हा अहमदाबाद येथे रविवारी (ता. २०) झालेल्या दुसऱ्या राउंडमध्येही पूर्वाने आपला परफॉमन्स कायम राखत खेलो इंडिया वुमन्स सीरिज- २ मध्ये ज्युनियर मुलींच्या गटात २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. तसेच ४०० मीटर फ्री स्टाईल प्रकारातही चौथा क्रमांक पटकावला आहे. पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून पुणे-बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये दहावीच्या शिक्षणासह जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.