ढगाळ वातावरणाची बागायतदारांना धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ वातावरणाची 
बागायतदारांना धास्ती
ढगाळ वातावरणाची बागायतदारांना धास्ती

ढगाळ वातावरणाची बागायतदारांना धास्ती

sakal_logo
By

ढगाळ वातावरणाची
बागायतदारांना धास्ती

तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची शक्यता

सावंतवाडी, ता. २२ ः सलग तिन दिवस थंडीची तिव्रता जाणवत होती; मात्र मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आंबा बागातयदार धास्तावले आहेत. हापूसच्या कलमांवर तुडतुड्यांचा अटॅक होण्याची भीती वर्तविली जात आहे. पुढील दोन ते तिन दिवस काय परिस्थिती राहणार याकडे बागायतदारांचे लक्ष लागले आहे.
दिवाळीच्या पुर्वसंध्येला मोसमी पाऊस माघारी परतला आणि गुलाबी थंडीचे आगमन झाले; मात्र गेल्या महिन्याभरात थंडीचा जोर कायम राहिलेला नाही. शुक्रवारपासून (ता. १८) जिल्ह्यात थंडीची तिव्रता वाढू लागली. त्यामुळे आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने २३ नोव्हेंबरपर्यंत आकाश अशंतः ढगाळ राहील अशी शक्यता वर्तविली होती. तसेच कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल आणि किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळच्या सत्रात सुर्यदर्शनही झालेली नव्हते. या वातावरणाचा परिणाम हापूस कलमांवर होण्याची भिती वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत तुडतुड्याचा प्रादुर्भाव कलमांवर होतो. पालवीवर खार पडून ती डागाळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी बागायतदारांना औषध फवारणी करावी लागेल. वातावरण जेवढे दिवस ढगाळ राहील, तेवढा तुडतुड्याचा अ‍ॅटॅक अधिक होत राहील. जिल्ह्यातील नव्वद टक्केहून अधिक झाडांना पालवी आहे. दोन दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. हे वातावरण हापूसला पोषक नाही. मोहोर येण्यासाठी थंडी पडणे आवश्यक आहे. पुढील आठ दिवसांत तापमानातील चढ-उतार कसा राहील यावर हंगामाचे चित्र अवलंबून राहणार आहे.