वांद्रे टर्मिनसवर नवीन स्कायवॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्रे टर्मिनसवर 
नवीन स्कायवॉक
वांद्रे टर्मिनसवर नवीन स्कायवॉक

वांद्रे टर्मिनसवर नवीन स्कायवॉक

sakal_logo
By

वांद्रे टर्मिनसवर
नवीन स्कायवॉक
मुंबई, ता. २२ ः पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून उपनगरीय लोकल सेवांच्‍या फलाटांवर जाण्यासाठी प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने आता वांद्रे उपनगरीय स्थानकाच्या उत्तर टोकाला असलेला ओव्हरब्रिज वांद्रे टर्मिनसवर जोडण्यासाठी ३५० मीटर लांबीचा नवीन स्कायवॉक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. लवकरच रेल्वे बोर्डाला प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
सध्या पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर येणाऱ्या प्रवाशांना वांद्रे उपनगरीय स्थानकाकडे जाण्यास अडचणी येतात. खार रोड स्थानकांवरून स्कायवॉक उपलब्ध आहे. खार रोडवर फक्त धीम्या कॉरिडॉर उपनगरीय सेवा उपलब्ध आहे. परंतु जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना वांद्रे स्थानकात यावे लागते. खार स्थानकापासून रस्ते मार्ग लांब असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने वांद्रे उपनगरीय स्थानकाच्या उत्तर टोकाला असलेल्या ओव्हर ब्रिजला वांद्रे टर्मिनसवर जोडण्यासाठी एक नवीन स्कायवॉक तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या नवीन स्कायवॉकची लांबी सुमारे ३५० मीटर असणार आहे. यामुळे सध्याच्या खार रोड कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, प्रवासी वांद्रे उपनगरीय स्थानकावरून वांद्रे टर्मिनसला पोहोचू शकतात.
--
अभ्युदयच्या विद्यार्थिनींचे कबड्डीमध्ये यश
वडाळा (बातमीदार) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद मुंबई शहर, शिवशक्ती महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन श्रमिक जिमखाना येथे करण्यात आले होते. १५ ते २१ नोव्हेंबरदरम्‍यान पार पडलेल्‍या या कबड्डी स्पर्धेमध्ये अभ्युदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल (मराठी माध्यम)च्‍या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून गौरवास्पद कामगिरी बजावली आहे. या त्यांच्या यशामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा फणसेकर, उपमुख्याध्यापक संजय काटे, पर्यवेक्षक भगवान शेवाळे, क्रीडा शिक्षक समाधान डोंगरे यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व शिक्षक वर्ग तसेच प्रशिक्षक नितीन विचारे आणि विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.