कणकवलीत रविवारी ‘मस्करिका’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत रविवारी ‘मस्करिका’
कणकवलीत रविवारी ‘मस्करिका’

कणकवलीत रविवारी ‘मस्करिका’

sakal_logo
By

कणकवलीत रविवारी ‘मस्करिका’

कणकवली,ता. २३ : स्वामीराज प्रकाशन ही संस्था दर महिन्याच्या २७ तारखेला ‘मराठी आठव दिवस’ उपक्रम साजरा करते. या उपक्रमांतर्गत येत्या रविवारी (ता. २७) कणकवली येथे ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर यांचा ‘मस्करिका’ हा काव्य - संवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. संयोजक प्रसाद सावंत आणि स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे यांनी ही माहिती दिली.
‘मराठी आठव दिवस’ हा मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचा उपक्रम असून आतापर्यंत कोल्हापूर, कणकवली, गोवा, पुणे, मुंबई, नाशिक, शिर्डी, ठाणे, नालासोपारा, कल्याण येथे विविध कार्यक्रम सादर झाले आहेत. या उपक्रमास अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक संतोष पवार, राजेश देशपांडे, पोलिस उपायुक्त रुपाली अंबुरे, गायक अतुल बेले, मेघा विश्वास आदी मान्यवर जोडले गेले आहेत. संस्थेने ‘मराठी दिवाळी’ही साजरी केली. विशेष म्हणजे यावेळी स्वेच्छा निधी गोळा केला आणि हा निधी आता नगर जिल्ह्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना वितरित केला जाणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने २५ हजारांची देणगी जाहीर केली आहे. कणकवलीत एप्रिल मध्ये ‘मराठी आठव दिवस’ साजरा झाला होता. कणकवलीवासीयांनी पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण दिल्याने २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाला अशोक नायगावकर आणि महेश केळुसकर या दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा ‘मस्करिका’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. जानवली येथील माती नेचर रिसॉर्ट येथे हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य आहे.