वेंगुर्लेत सोन्याची अंगठी सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत सोन्याची 
अंगठी सापडली
वेंगुर्लेत सोन्याची अंगठी सापडली

वेंगुर्लेत सोन्याची अंगठी सापडली

sakal_logo
By

वेंगुर्लेत सोन्याची
अंगठी सापडली
वेंगुर्ले ः येथील मानसीश्वर देवस्थानच्या ठिकाणी रस्त्यानजीक अगरबत्ती लावण्याच्या जागेवर सोन्याची अंगठी सापडली. उभादांडा-सागरेश्वरवाडी येथील दत्ताराम परुळेकर (वय ५३) यांनी ही अंगठी प्रामाणिकपणे वेंगुर्ले पोलिसांत जमा केली आहे. अंगठी मालकाने पावतीच्या पुराव्यासह वेंगुर्ले पोलिसांत येऊन हवालदार गजेंद्र भिसे यांच्याशी संपर्क साधून ओळख पटवून घेऊन जावी, असे आवाहन वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.
--
डोंगरपाल माऊली
जत्रोत्सव आज
बांदा ः डोंगरपाल येथील देवी माऊलीचा श्री वार्षिक जत्रोत्सव देव दीपावलीच्या मुहुर्तावर उद्या (ता. २४) ला होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजाअर्चा व अभिषेक, देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
--------------
पडवे रवळनाथ
जत्रोत्सव उद्या
ओरोस ः पडवे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा जत्रोत्सव शुक्रवारी (ता. २५) होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ नंतर ओटी भरणे, रात्री देवाची पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी, ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
----
आरोस माऊलीची
१ डिसेंबरला जत्रा
सावंतवाडी ः भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आरोस येथील जागृत देवस्थान म्हणजे श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव १ डिसेंबरला होत आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आरोसवासीयांनी केले आहे.
--
एक्स्प्रेसला
स्लीपर बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील हापा-मडगाव-हापा साप्ताहिक एक्स्प्रेसला एक दिवसासाठी जादा बोगी जोडण्यात येत आहे. ही बोगी स्लीपर स्वरुपाची आहे. त्यानुसार २५ नोव्हेंबरची मडगाव-हापा (२२९०७) एका जादा बोगीनिशी धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गाडीला कुडाळ स्थानकावर थांबा आहे.