खांबाळेत ३ डिसेंबरला राज्यस्तरीय भजन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खांबाळेत ३ डिसेंबरला 
राज्यस्तरीय भजन स्पर्धा
खांबाळेत ३ डिसेंबरला राज्यस्तरीय भजन स्पर्धा

खांबाळेत ३ डिसेंबरला राज्यस्तरीय भजन स्पर्धा

sakal_logo
By

64148
श्री देवी आदिष्टी

खांबाळेत ३ डिसेंबरला
राज्यस्तरीय भजन स्पर्धा

आदिष्टी देवी जत्रोत्सव; नामवंत मंडळांचा सहभाग

वैभववाडी, ता. २३ ः खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव ३ डिसेंबरला होत आहे. यानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.
खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव मोक्षदा एकाशीला ३ डिसेंबरला होत आहे. राज्यस्तरीय भजन स्पर्धा ३ डिसेंबरला दुपारी तीनला सुरू होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १५,५५५ रुपये व कायमस्वरुपी चषक, द्वितीय १०,५५५ रुपये व कायमस्वरुपी चषक, तृतीय ७,५५५ रुपये व कायमस्वरुपी चषक, चतुर्थ क्रमांक ५,५५५ रुपये व कायमस्वरुपी चषक, पाचवा ४,५५५ रुपये व कायमस्वरुपी चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गायक, हार्मोनियम, पखवाज, तबला, उत्कृष्ट कोरस, झांज वादक यांना प्रत्येकी १,५५५ रुपये व कायमस्वरुपी चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नामवंत १४ भजनी मंडळांना निमंत्रित केले आहे. यामध्ये स्वरधारा तांबोळी, सद्गुरू वडखोल, स्वामी समर्थ कलंबिस्त, विश्वकर्मा रत्नागिरी, मेजारेश्वर नागवे, स्वराभिषेक मणेरी, नादब्रम्ह कसाल, स्वामीगंध राधानगरी, दत्तकृपा वैभववाडी, पावणादेवी फोंडाघाट, दत्तगुरू वैभववाडी, प्राथमिक शिक्षक कलामंच कुडाळ, मोरेश्वर नेरुर आणि गजानन प्रासादिक मंडळ पोंभुर्ले यांचा समावेश आहे.