आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा
आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा

sakal_logo
By

64149
नेरुरपार ः आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट दिली. (छायाचित्र ः अजय सावंत)

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा

प्रदीप बर्डे ः नेरुरच्या विद्यार्थ्यांची विज्ञान केंद्रास भेट

कुडाळ, ता. २३ ः तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना विज्ञानाची कास धरली पाहिजे. विज्ञान विषयक विविध गोष्टी आत्मसात करून यश मिळवा, असे प्रतिपादन वसुंधरा विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक प्रदीप बर्डे यांनी केले.
नेरुर येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत नेरुरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्राला शैक्षणिक भेट दिली. यावेळी विभावरी पराडकर व रेणुका नगोळकर यांनी युरेका लॅब, विज्ञान पार्क, भूगोल पार्क, रानभाज्या या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रयोगांद्वारे माहिती सांगून मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. साहित्यिक महावीर जोंधळे, अरविंद पाटकर, दीपा देशमुख, इंदुमती जोंधळे, अरुणा सबाने यांनी शास्त्रज्ञांच्या व साने गुरुजींच्या जीवनातील गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी बर्डे म्हणाले, ‘‘आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. भविष्यात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक आव्हानांना सामोरे जात त्यावर मात करून यशस्वी वाटचाल केली पाहिजे. वसुंधरा विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी वैज्ञानिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असून हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. गेली बरीच वर्षे येथे विविध वैज्ञानिक प्रयोग, प्रात्याक्षिकांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी, पालकांसह अनेक मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन संस्थेचे कौतुक केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करायची असेल, त्यांच्यासाठी संस्था नेहमीच कार्यरत राहील.’’ मुख्याध्यापिका वेदिका परब, नीलम मेस्त्री उपस्थित होत्या.