ग्रामपंचायत निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार
ग्रामपंचायत निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार

ग्रामपंचायत निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार

sakal_logo
By

rat२३१४.txt

(टुडे पान ४ साठी)

ग्रामपंचायत निवडणूका भाजप स्वबळावर लढविणार

मुन्ना चवंडे ; रत्नागिरीतील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २३ ः तालुक्यात पुढील महिन्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी दिली.
भाजपाचे तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, ओंकार फडके, संकेत कदम, विजय सालीम, किसन घाणेकर, संजय निवळकर, संदीप शिंदे, सचिन दुर्गवळी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपाने रत्नागिरी तालुक्यात दौरा केला. त्यानंतर ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी सांगितले.
तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतीकरिता होणाऱ्या या निवडणुकीत सर्वच ठिकाणी सरपंच व सदस्य उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सर्वच ठिकाणी आपले उमेदवार देणार असल्याचे चवंडे म्हणाले. भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे चवंडे यांनी सांगितले. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुन्ना चवंडे यांनी व्यक्त केला.