राजापूर शहरात रस्ता कामामुळे धुळीचा त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर शहरात रस्ता कामामुळे धुळीचा त्रास
राजापूर शहरात रस्ता कामामुळे धुळीचा त्रास

राजापूर शहरात रस्ता कामामुळे धुळीचा त्रास

sakal_logo
By

rat२३२०.txt

(टुडे पान ४ साठी)

राजापूर शहरात रस्ता कामामुळे धुळीचा त्रास

राजापूर, ता. २३ ः शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे; मात्र, गेल्या काही दिवसांपासून अर्धवट स्थितीमध्ये असलेल्या या रस्त्यामधून वाहनांच्या होणाऱ्‍या वर्दळीमुळे उडणाऱ्‍या धुळीचा सर्वसामान्यांसह व्यापार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अर्धवट स्थितीमध्ये असलेले काम वेळेमध्ये पूर्ण करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नगर पालिकेला दिले असून त्याच्यावर काही नागरिकांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.
शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यःस्थितीमध्ये हे काम अर्धवट स्थितीमध्ये ठेवण्यात आले आहे. अर्धवट स्थितीमध्ये असलेल्या या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ होत असताना मोठ्या प्रमाणात धुरळा उडतो. त्याचा त्रास सर्वसामान्यांसह व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यामुळे अर्धवट स्थितीमध्ये असलेले काम सुरू करून वेळेमध्ये पूर्ण करावे, अशी मागणी नार्वेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्याचवेळी त्यांनी या रस्त्याचे दर्जेदार काम कसे होईल या दृष्टीनेही योग्य ती कार्यवाही व्हावी. त्यासाठी वेळप्रसंगी आठवडाभर सर्व वाहतूक बंद ठेवण्याचेही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचित केले आहे.