पोफळीत माकडांचा त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोफळीत माकडांचा त्रास
पोफळीत माकडांचा त्रास

पोफळीत माकडांचा त्रास

sakal_logo
By

rat२३२५.txt

(टुडे पान ४ साठी)

पोफळीत माकडांचा त्रास

चिपळूण, ता. २३ ः पोफळी परिसरात सध्या माकड व वानरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे. येथील स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. मालमत्तेच्या नुकसनीबरोबरच काही लोकांवर माकडांनी हल्ले करून जखमी केले आहे. त्यामुळे माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक वनविभागाकडे करत आहेत. पोफळीत महानिर्मिती कंपनीची कर्मचारी निवासी वसाहत आहे. या भागात माकडे रोज धुमाकूळ घालत असून छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडत आहे. तसेच वीजवाहिन्या, गच्चीत ठेवलेले सामान, पाण्याच्या टाक्या, झाडाच्या कुंड्या, झाडे यांचे नुकसान करत आहेत. बाहेर कोणतेही वाळण घालता येत नाही. घराची दारे, खिडक्याही खुल्या ठेवणे कठीण झाले आहे. माकडे अन्नधान्य, भाजीपाल्याची नासाडी करत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ही माकडे कुंभार्ली घाटातून खाली गावात येत आहेत.

कोट
माकडांना कोणीही खाऊ घालू नये. तसे केल्यास त्यांचा मानवी वस्तीत संचार वाढतो. माकडे पकडण्यासाठी वनविभागाकडे विशेष यंत्रणा किंवा कार्यपद्धती नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या पळवून लावणे योग्य आहे.

- रामदास खोत, वनपाल, चिपळूण