रत्नागिरी-जिल्हा काँग्रेसच्या तालुकानिहाय कॉर्नर सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्हा काँग्रेसच्या तालुकानिहाय कॉर्नर सभा
रत्नागिरी-जिल्हा काँग्रेसच्या तालुकानिहाय कॉर्नर सभा

रत्नागिरी-जिल्हा काँग्रेसच्या तालुकानिहाय कॉर्नर सभा

sakal_logo
By

काँग्रेसच्या तालुकानिहाय कॉर्नर सभा
भारत जोडोचा प्रचार ; शनिवारी आयोजनासाठी सभा
रत्नागिरी, ता. २३ः भारत जोडो प्रचारार्थ रत्नागिरी जिल्हा काँग्रेस तालुकानिहाय कॉर्नर सभा घेणार असून त्याच्या नियोजनार्थ शनिवारी (ता. २६) रत्नागिरी जिल्हा कार्यालयात सभा आयोजित केली आहे.
याबाबत अशोक जाधव यांनी सांगितले, काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर काढलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्या अनुशंगाने नफरत छोडो-भारत जोडो आणि तळागाळात काँग्रेस संघटन मजबूत करुन सर्व जनतेला सामावून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी खासदार हुसेन भाई दलवाई , माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलफे, माजी आमदार डॉ. मोकल, अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली भारत जोडो प्रचारार्थ नियोजनाची बैठक सकाळी ११ वाजता काँग्रेस भुवन येथे होणार आहे. पक्षाचे सर्व सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व विद्यमान तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी प्रत्येक तालुक्यात भारत जोडो प्रचारार्थ गाडीने किमान दहा सभा घ्यायच्या असून जास्तीत जास्त तालुक्याचा विभाग फिरायचा आहे.