भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर

sakal_logo
By

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर
स्वागताची जोरदार तयारी सुरू; बाईक रॅली होणार
रत्नागिरी, ता. २३ ः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस रत्नागिरी, लांजा, राजापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपा संघटन अधिक मजबूत करताना आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताची जोरदार तयारी भाजपा कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे गुरुवारी (ता. २४) रात्री रत्नागिरीत आगमन होईल. २५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते १० वाजता समन्वय बैठक, सकाळी १० ते १०.२५ वाजता युवा वॉरियर फलक उद्घाटन करतील. त्यानंतर ते तासभर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. ११ ते १२ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून ते जयस्तंभ येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयापर्यंत बाईक रॅलीत ते सहभागी होतील. नंतर १२.१० ते १.३० या वेळेत वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, बूथप्रमुख, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
दुपारी दीड ते २ वाजेपर्यंत ओबीसी समाज पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.४५ ते ३.१५ वाजता या दरम्यान भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. दुपारी ३.१५ वाजता ते रत्नागिरीतून लांजाला जाणार आहेत. सायंकाळी ४.१५ वाजता ते लांजा येथे धन्यवाद मोदीजी लाभार्थी पत्र व नूतन सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. ४.४५ वा. ते लांजातून राजापूरला निघतील. त्यानंतर ५.३० वा. ते नवमतदार व बूथ बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
----------
चौकट
बाईक रॅलीतून शक्तीप्रदर्शन
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या जंगी स्वागताची तयारी भाजपाने केली आहे. भाजपाकडून ५०० बाईकस्वारांची रॅली छत्रपती शिवाजी क्रीडांगण ते जयस्तंभ येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय काढण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक राजू तोडणकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रॅलीचे नियोजन तोडणकर, करमरकर यांच्यासह विक्रम जैन, संदीप सुर्वे, नितीन जाधव, संदीप रसाळ आदी करत आहेत.