जात पडताळणी प्रमाणपत्र द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जात पडताळणी प्रमाणपत्र द्या
जात पडताळणी प्रमाणपत्र द्या

जात पडताळणी प्रमाणपत्र द्या

sakal_logo
By

64203
प्रवीण काकडे

जात पडताळणी प्रमाणपत्र द्या

प्रवीण काकडेंची मागणी; अधिकाऱ्यांना लवकरच निवेदने

तळेरे, ता. २२ ः धनगर समाज व इतर जाती जमातीतील मागासवर्गीयांची जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरीत मिळावीत, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याबाबत लेखी निवेदन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विभागीय कार्यालयाकडे जावे लागत होते; परंतु ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्याकडून जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय उघडली; परंतु जिल्हास्तरीय कार्यालयाकडून एखाद्या विद्यार्थ्यांस व्यक्तीस नोकरदार किंवा ज्यांना आवश्यक आहे, अशांना सहजासहजी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ३६ जिल्ह्यातील सामाजिक विभागाचा आढावा नुकताच घेतला होता. ज्या जिल्ह्याच्या जातपडताळणी समिती कार्यालयात तक्रारी आहेत, अशांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांचे अध्यक्षतेखाली १० जणांची समिती गठीत केली असून या समितीत तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या आहेत. ही समिती राज्यभर फिरून जिल्ह्यातील समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या समितीतर्फे सबंधित जात पडताळणी समितीकडून दिलेली जात पडताळणी प्रमाणपत्रे बोगस-प्रलंबित प्रकरणाची कारणे, दक्षता पथकाचा कारभार, शैक्षणिक प्रमाणपत्रे प्रलंबित तक्रार अर्जाची कारणे याचा आढावा घेण्यात येणार आहे. आतापर्यंत समाजकल्याण कार्यालयाचा कारभार हा मनमानी स्वरूपात केला जात असून विनाकारण सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबधित अधिकारी यांनी प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी काकडे यांनी केली असून लवकरच राज्यातील ३६ जिल्ह्यातील अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.