कापडी पिशव्यांचा वापर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापडी पिशव्यांचा वापर करा
कापडी पिशव्यांचा वापर करा

कापडी पिशव्यांचा वापर करा

sakal_logo
By

rat२३२६.txt

(पान ५ साठी,संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat२३p१६.jpg ः
६४१८७
चिपळूण ः पालिकेचे आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी शहरातील प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली.


प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा

चिपळूण ः ग्राहकांना दुधासह कोणतीही वस्तू खाद्यपदार्थ देताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. त्याऐवजी कापडी पर्यायी पिशव्यांचा वापर करावा, ग्राहकांनाही तसा आग्रह धरावा, असे सूचनावजा आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाचे निरिक्षक महेश जाधव यांनी शहरातील व्यापाऱ्यांना केले. चिपळूण शहरात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यात प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करत व्यापाऱ्यांना प्लास्टिक न वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाचे निरीक्षक जाधव यांनी विविध प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करत ७ हजार रुपयाचा दंड वसुल केला. या वेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना जाधव म्हणाले, सरकारने प्लास्टिकबंदी कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारने केलेला कायदा नागरिकांनी पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये आणि पालिकेला सहकार्य करावे.

फोटो ओळी
-rat२३p५.jpg ः
६४१८६
विनायक हंबीर

मनविसे मंडणगड तालुका संपर्क अध्यक्षपदी विनायक हंबीर

मंडणगड ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मंडणगड तालुका संपर्क अध्यक्षपदी विनायक हंबीर यांची निवड करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य, वैद्यकीय सुविधा, पक्षाचे आंदोलन, मेळावे, बैठका यामधील सक्रिय सहभाग आदी कामांची दखल घेत तालुक्यातील वाढवलेला जनसंपर्क यामुळे विनायक हंबीर तालुका संपर्क अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.