प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी
प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई व्हावी

sakal_logo
By

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या
कंपन्यांवर कारवाई व्हावी
पावस, ता. २३ः परिसरामध्ये प्लास्टिकचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दंडात्मक आदेश देण्यात आले आहेत. प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर ती कारवाई करावी म्हणजे खऱ्या अर्थाने प्लास्टिक बंदी होईल असे दुकानदारांमधून बोलले जात आहे.
प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण व गटारांवरती होणारा विपरित परिणाम हा संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाने प्लास्टिक बंदी सुरू केली आहे. तरीही प्लास्टिक विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लोकांची मानसिकता बदललेली नसल्यामुळे ग्राहक राजरोसपणे कॅरीबॅगचा वापर करत आहे. राज्यामध्ये दारूबंदी, गुटखाबंदी आणि अंमली पदार्थ बंदी आधी गोष्टी शासनाच्यावतीने करण्यात येत आहेत; परंतु कागदोपत्री बंदी दाखवली जाते. प्रत्यक्षात मात्र कोणतीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे या गोष्टी ज्यादा दराने विकल्या जात आहेत. यामुळे बंदीचा फायदा उत्पादन करणाऱ्या लोकांना जास्त होत आहे. उत्पादन करणाऱ्या कंपन्या जास्त दर लावून आपला व्यवसाय करत आहेत. या संदर्भात संकेत राडये यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्लास्टिक बंदी करावी याला आमचा विरोध नाही; परंतु याची प्रत्येकाला चटक लागलेली आहे. त्यामुळे मुळात ही चटक कमी करण्यासाठी प्रत्यक्षात उत्पादन करणाऱ्या प्लास्टिक कंपन्यांवर बंदी घातली तरच खऱ्या अर्थाने बंदी होऊ शकते. अन्यथा या गोष्टी राजरोसपणे सुरू राहणार आहेत.