-कोकणातून उच्चपदस्य अधिकारी तयार होतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-कोकणातून उच्चपदस्य अधिकारी तयार होतील
-कोकणातून उच्चपदस्य अधिकारी तयार होतील

-कोकणातून उच्चपदस्य अधिकारी तयार होतील

sakal_logo
By

rat२३१६.txt

(पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat२३p६.jpg ः
६४१६४
लांजा ः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत लांजा तालुका जिल्ह्यात अव्वल असून तब्बल ४६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. या विद्यार्थ्यांसह उपस्थित आमदार राजन साळवी आणि मान्यवर.


कोकणातून उच्चपदस्य अधिकारी तयार होतील

राजन साळवी ; शिष्यवृत्तीप्राप्त ४६ गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा ः
लांजा, ता. २३ ः प्रामाणिक प्रयत्न केले की, यश नक्कीच मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर कोकणातूनदेखील उच्चपदस्य अधिकारी तयार होतील. त्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी तुमच्या पाठीशी राहील, असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी लांजा येथे व्यक्त केला.
शिवसेनेचे माजी तालुका संपर्कप्रमुख व मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव (कै.) काकासाहेब सरफरे स्मृती एसएससी व्याख्यानमाला व लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच झाला. न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या सभागृहात हा सोहळा झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजन साळवी बोलत होते. या वेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक महंमद रखांगी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, उद्योजक सुबोध सरफरे, संदीप दळवी, एमकेसीएलचे संचालक संतोष कोलते, लांजा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, दत्ता कदम, संजय तेंडुलकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद सावंग, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, दत्तात्रय देसाई, मुख्याध्यापिका आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात (कै.) काका सरफरे व्याख्यानमाला यांच्यावतीने सुबोध सरफरे यांनी आकर्षक भेटवस्तू देऊन तालुक्यातील एकूण ४६ विद्यार्थ्यांचा गौरव केला. महंमद रखांगी यांनी या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे महत्व विषद करताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक असले पाहिजे, असे सांगितले. या शिष्यवृत्तीचा उपयोग आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावा, असे सूचित केले. संदेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

दत्तात्रय देसाई, सुबोध सरफरेंचा सत्कार

या कार्यक्रमात राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यानिकेतन माध्यमिक शाळा खावडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांचा व या उपक्रमाला विशेष आर्थिक सहकार्य करणारे उद्योजक सुबोध सरफरे यांचा लांजा तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने आमदार साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.